Goa To Bangalore: गोवा ते बंगळुरू रिंग रोड होणार! नितीन गडकरी यांची घोषणा; 15 हजार कोटींची तरतूद

Nitin Gadkari: कुठ्ठाळी येथे नवीन झुआरी पुलावरील टेहळणी मनोरा (ऑब्झर्व्हेटरी टॉवर्स ॲण्ड व्हिविंग गॅलरीज) प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमात शुक्रवारी मंत्री गडकरी बोलत होते.
Nitin Gadkari
Goa To Bangalore Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पत्रादेवी ओलांडल्यावर गोव्यातून होणारी वाहतूक कमी करण्यासाठी १२ ते १५ हजार कोटी रुपये खर्च करून गोवा ते बंगळुरू असा प्रशस्त रिंग रोड बांधण्याचा विचार आहे. त्यासंबंधी अभ्यास सुरू आहे. हा महामार्ग तयार झाल्यावर गोव्यातील रस्त्यांचे अनेक प्रश्न संपुष्टात येतील, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

कुठ्ठाळी येथे नवीन झुआरी पुलावरील टेहळणी मनोरा (ऑब्झर्व्हेटरी टॉवर्स ॲण्ड व्हिविंग गॅलरीज) प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमात शुक्रवारी मंत्री गडकरी बोलत होते. हा कार्यक्रम चिखली पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, दाजी साळकर, आंतोनियो वाझ, वीरेश बोरकर, रेजिनाल्ड लॉरेन्स, नगराध्यक्ष गिरीष बोरकर आणि मान्यवर उपस्थित होते.

Nitin Gadkari
Zuari Bridge Tower: पर्यटन सौंदर्यात भर! झुआरी पूलावर 'आयफेल' सदृश्य 125 मीटर उंच मनोरा; नितीन गडकरींच्या हस्ते पायाभरणी

गडकरी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

गोव्यातील महामार्गांची विकासकामे संपण्याच्या मार्गावर

राज्यातील रस्ते व पायाभूत साधनसुविधांसंबंधीचे चित्र आता बदलणार

रस्ते रूंद आणि दर्जेदार बनल्याने वेळ आणि इंधनाची बचत

गोव्याच्या हिताचे प्रकल्प हाती घेतले जातील

दर्जेदार रस्त्यांमुळे अपघातांना आळा बसून, वाहतूक कोंडी संपणार

मुंबई-गोवा महामार्ग निर्मितीमधील अडचणी संपुष्टात; तीन-चार महिन्यांत महामार्ग खुला

आता गोवा-मुंबई प्रवासासाठी लागणार ५ ते ६ तास

झुआरी पुलावरील टेहळणी मनोरा हा माझा ‘ड्रिम प्रोजेक्ट’

या प्रकल्पामुळे राज्याला ‘जीएसटी’ रूपाने मिळणार कोट्यवधी रुपये

Nitin Gadkari
Nitin Gadkari: 'विनंती', 'मागणी', 'अपेक्षा'! तीन शब्दांच्‍या शाली खांद्यावर घेऊन गडकरींनी गोवा सरकारला मारले जोडे

प्रकल्प पाहण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत होणार वाढ

मनोऱ्याच्या अंतर्गत सजावटीसाठी व संकल्पनासाठी आर्किटेक्टची स्पर्धा घ्या

त्यातील चांगली संकल्पना असलेले आराखडे निवडा

गोव्यात वॉटर टॅक्सीचा विचार होणे आवश्यक

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉलचा वापर होणे गरजेचे

पर्यावरणाचा विचार करून अधिकाधिक झाडे लावा

पर्यावरणाबरोबर विकासही हवा, याचा विचार करा

नवीन संकल्पना घेऊन प्रयागराज येथे केबल पूल बांधणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com