IND vs PAK World Record: भारतीय संघाने पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. आशिया कप 2025 च्या सुपर 4 च्या सामन्यात भारतीय संघाने पाकड्यांची पुन्हा एकदा जिरवली. भारतीय संघापुढे पाकिस्तानचा संघ कुठेही टिकला नाही. रविवारी (21 सप्टेंबर) झालेल्या हाय होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. जवळजवळ हा सामना एकतर्फी ठरला. या विजयासह, भारतीय संघाने एका अनोख्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली. आता भविष्यात पाकिस्तानला आणखी एकदा हरवून भारतीय संघ हा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.
दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत 171 धावांचे लक्ष्य ठेवले. हे आव्हान मोठे असले तरी भारतीय फलंदाजांनी ते सहज पार केले. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आणि पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय एका विशिष्ट विक्रमामुळे अधिक चर्चेत आला.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ सातत्याने पाकिस्तानला हरवत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानी संघ फारशी टक्करही देऊ शकत नाही. हा सिलसिला 2022 च्या टी20 वर्ल्ड कपपासून सुरु झाला आणि तो आजही कायम आहे. या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने नंतर फलंदाजी केली आहे आणि प्रत्येक वेळी धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. म्हणजेच, भारताने पाकिस्तानला धावांचा पाठलाग करताना सहजपणे हरवले.
रविवारी भारताने आशिया कपच्या सुपर 4 च्या सामन्यात पाकिस्तानला हरवले, तेव्हा भारतीय संघाने एका खास विक्रमाची बरोबरी साधली. हा विक्रम एकाच संघाला धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा हरवण्याचा आहे. याआधी हा विक्रम केवळ मलेशियाच्या नावावर होता. मलेशियाने थायलंडला धावांचा पाठलाग करताना सलग आठ वेळा हरवले होते.
आता भारतानेही पाकिस्तानला धावांचा पाठलाग करताना सलग आठव्यांदा हरवून या विक्रमाची बरोबरी केली आहे. 2022 पासून आजपर्यंत, जेव्हा जेव्हा भारताने पाकिस्तानसोबत खेळताना नंतर फलंदाजी केली, तेव्हा प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. ही एक अशी अनोखी कामगिरी आहे, जी क्रिकेट विश्वात क्वचितच पाहायला मिळते. यामुळे भारतीय संघाची धावांचा पाठलाग करण्याची क्षमता किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जर भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एखादा सामना झाला आणि त्यातही भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला, तर हा एक जागतिक विक्रम ठरेल. भारतीय संघ हा विक्रम आपल्या नावावर करणारा जगातील पहिला संघ बनेल. आशिया कपमध्येच जर भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत समोरासमोर आले, आणि भारताने पुन्हा नंतर फलंदाजी करताना पाकिस्तानला हरवले, तर हा विक्रम लवकरच साकार होईल.
मात्र, पाकिस्तानच्या (Pakistan) सध्याच्या कामगिरीनुसार, त्यांच्यासाठी अंतिम फेरी गाठणे खूप कठीण दिसत आहे. सध्याच्या आशिया कपमध्ये त्यांची कामगिरी अत्यंत खराब आहे आणि त्यांच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे, भारतीय संघाला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण, भारतीय संघाच्या सध्याच्या फॉर्मनुसार, येत्या काळात हा विक्रम त्यांच्या नावावर नक्कीच होईल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.