Supreme court Dainik Gomantak
देश

Supreme Court On Demonetization: नोटाबंदी प्रकरणी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारने 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

नोटाबंदीचा (Demonetization) हा निर्णय घेताना अवलंबलेल्या प्रक्रियेत कोणतीही कमतरता नव्हती, त्यामुळे ती अधिसूचना रद्द करण्याची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताना सांगितले आहे. नोटाबंदीनंतर रद्द नोटा चलनात आणण्याचा स्वतंत्र अधिकार आरबीआयकडे (RBI) नाही, अस देखील न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

यासोबतच केंद्र सरकार आरबीआयच्या शिफारशीनंतरच असा निर्णय घेऊ शकते, असे न्यायालयाने सांगितले आहे. नोटाबंदीच्या उद्देशाचा संदर्भ देत न्यायमूर्ती गवई म्हणाले की, तो उद्देश पूर्ण झाला की, नाही याने काही फरक पडत नाही.

  • नोटबंदीच्या निर्णयामुळे देशभरात खळबळ

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अचानक टीव्हीवर येऊन नोटाबंदीचा निर्णय घोषित केला होता. या घोषणेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून एटीएम आणि बँकांसमोर लोक सकाळपासून रात्रीपर्यंत रांगेत उभे राहून आपल्याकडच्या जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेत होते. जुन्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्याचं सत्र बरेच दिवस चालले. लोकांना अनेक आर्थिक समस्यांचा तोंड द्यावे लागले होते.

यापूर्वी खंडपीठानं केंद्राच्या 2016 च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी, आरबीआयचे वकील आणि ज्येष्ठ न्यायाधीश पी चिदंबरम, श्याम दिवान यांच्यासह याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला होता. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीदरम्यान निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावत केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT