Firing in Jammu & Kashmir: काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात तिघांचा मृत्यू; 10 जखमी

श्रीनगरमध्ये ग्रेनेड फेकला; जवानाकडून हिसकावली रायफल
Indian Army
Indian ArmyDainik Gomantak

Firing in Jammu & Kashmir: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवादी घटना घडल्या आहेत. दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, श्रीनगरमधील हवाल चौकात सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यात एक नागरिक जखमी झाला आहे तर पुलवामाच्या राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून AK-47 रायफल हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

Indian Army
Election 2023: नव्या वर्षात 'या' 10 राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी...

राजौरीतील डांगरीमध्ये दहशतवाद्यांनी संध्याकाळी 6-7 च्या सुमारास गावातील लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 3 ग्रामस्थांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. जखमींवर राजौरी येथील असोसिएटेड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसरी दहशतवादी घटना श्रीनगरमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. येथील हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात जवानांची कोणतीही हानी झाली नसली तरी समीर अहमद मल्ला हा सर्वसामान्य नागरिक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Indian Army
Delhi Crime News: मद्यधुंद तरूणांच्या कारने युवतीला 7 किलोमीटर फरफटत नेले...

रविवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावून घेतल्याची घटना समोर आली आहे. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सायंकाळी रायफल हिसकावणाऱ्या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात सादर करत रायफल परत केली. इरफान बशीर गणी असे 25 वर्षांचा आहे. दहशतवाद्यांनी 183 बटालियनच्या जवानाकडून एके-47 रायफल हिसकावून घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com