दक्षिण भारतात (South India) पावसाचा (Rain) कहर सुरुच असून, अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.  Dainik Gomantak
देश

दक्षिण भारतात अतिवृष्टीमुळे दैना, 'रेड अलर्ट' जारी

नोव्हेंबरमध्ये देशात आत्तापर्यंत 143.4 टक्के अतिरिक्त पाऊस (Rain), तिरुपतीच्या रहिवाश्यांकडून लोकांना सोशल मीडियावर प्रवास तुर्तस रद्द करण्याचे आवाहन.

दैनिक गोमन्तक

दक्षिण भारतात (South India) पावसाचा (Rain) कहर सुरुच असून, अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात 63 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तर 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण देशात 143.4 टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे.

भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ येथे 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, पूरासंदर्भात विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबरपासून ईशान्य मॉन्सूनच्या कालावधीत तामिळनाडूमध्ये 61 टक्के, पुद्दुचेरीत 83 टक्के, कर्नाटकात 105 टक्के, तर केरळमध्ये 110 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील सीमाभागात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे दक्षिण भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार, शुक्रवार येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळात 24 नोव्हेंबरपर्यंत 3523.3 मिमी पाऊस झाला आहे. तो 2018 च्या तुलनेत जास्त आहे. 2018 मध्येही राज्यात पूरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. पण यंदा मात्र तिन्ही ऋतूंमध्ये या दक्षिण भागात पाऊस पडत आहे. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात तिरुपती, तिरुमला येथे मोठ्या पावसाने आलेल्या पुरात यात्रेकरु आडकले होते. पुरामुळे तिरुपती मंदिराची देखील भीषण अवस्था झाली. येथील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. या पावसाचा रेल्वे आणि विमान सेवेवर देखील परिणाम झाला आहे. तिरुपतीच्या रहिवाश्यांनी लोकांना सोशल मीडियावर प्रवास तुर्तस रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

Punav Utsav: ‘एका रातीन आनी एका वातीन, माका देऊळ बांधून जाय’! शेकडो वर्षांची परंपरा असलेली पेडण्याची 'पुनाव'

Supreme Court On Cricket: 'क्रिकेट' आता खेळ नाही, केवळ व्यवसाय! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT