केरळमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाने रेड आणि ऑरेंज अलर्ट केला जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Monsoon
MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

केरळमध्ये (Kerala) पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे हवामान विभागाने (Meteorological Department) केरळमधील 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट (Red Alert), तर 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलप्पुझा, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड आणि वायनाड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज दिल्ली-यूपी बिहारसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासह दिल्लीमध्ये (Delhi) हिवाळ्याचे आगमन होईल असही हवामान विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. याचाच अर्थ पुन्हा एकदा हवामानात बदल होऊ लागला आहे. आधीच, दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी पडत आहे. दुसरीकडे, भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय रविवार आणि सोमवारसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या मते, हवामानातील हा बदल बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या बदलामुळे दिसू शकतो. पावसानंतर दिल्ली-एनसीआरचे तापमान कमी होऊ शकते. एक प्रकारे, असे म्हणता येईल की, दिल्लीमध्ये हिवाळ्याचे आगमन होईल.

Monsoon
Monsoon Update: देशातून मान्सून परतीच्या वाटेवर, मात्र काहीं राज्यात पाऊस सुरूच

झारखंडमध्येही हवामान बदल

झारखंडची राजधानी रांचीमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उत्तर-पश्चिमेकडून 10 किमी प्रति तास वेगाने वारा वाहत आहे. आणि आर्द्रतेची पातळी 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. हवामान खात्याच्या मते, आज रांचीमध्ये सामान्यतः ढगाळ वातावरण राहील. मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. यावेळी वादळी वाऱ्याची शक्यता देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहराचे कमाल तापमान आज दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे.

Monsoon
Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात

बिहारमध्येही मुसळधार पावसाची शक्यता

त्याचबरोबर बिहारच्या भागलपूरमध्ये आजपासून हवामानात बदल जाणवू लागला आहे. यासह, उद्यापासून कोसी सीमांचल आणि पूर्व बिहारच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या एक आठवड्यापासून लोक उष्णतेमुळे त्रस्त झाले होते. मात्र आज हवामानात झालेल्या बदलामुळे लोकांना नक्कीच दिलासा मिळाला असेल.

दरम्यान, उत्तर प्रदेशातही हवामान झपाट्याने बदलत आहे. येथे, पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने शनिवार, रविवार आणि सोमवारसाठी अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com