Sonia Gandhi Birthday Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi Birthday: सोनिया गांधी का करताहेत रणथंबोरमध्ये वाढदिवस साजरा? लाडक्या आईसाठी राहुल-प्रियांकाही पोहोचले

सोनिया गांधी आपला 76 वा वाढदिवस राजस्थानमधील रणथंबोर येथे साजरा करणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

'काँग्रेसचा नवा अध्यक्ष' या विषयावर सध्या देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर (Shashi Tharoor) यांना उमेदवारी दिल्यानं पक्षात खळबळ उडाली आहे. यासर्व घडामोडींसह सध्या देशभरात सुरु असलेली राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा'ही (Bharat Jodo Yatra) चर्चेत आहे.

राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी चार दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. दरम्यान सोनिया गांधी यांचा वाढदिवस जवळ येत असून त्या आपला 76 वा वाढदिवस राजस्थानमधील रणथंबोर येथे साजरा करणार आहेत. तसेच त्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

सोनिया गांधी गुरुवारीच राजस्थानमध्ये पोहोचल्या आहेत. 9 डिसेंबरला राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी रणथंबोरमध्ये एकत्र असतील. या दोघांसोबत सोनिया आपला वाढदिवस साजरा करणार आहे. 10 डिसेंबरची भारत जोडो यात्रा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली असून या दिवशी सोनिया गांधी या यात्रेत सहभागी होऊ शकतात. यानंतर त्या 11 डिसेंबरपर्यंत राजस्थानमध्ये राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाजवळील 'सुजन शेरबाग' या आलिशान रिसॉर्टमध्ये गांधी कुटुंब मुक्कामाला आहे. या रिसॉर्टचे मालक अंजली सिंग आणि जैसल सिंग आहेत. हे दोघेही गांधी घराण्याचे मित्र आहेत. याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे प्रियंका गांधी यांनी अंजली आणि जैसल सिंग यांच्यासोबत 'रणथंबोर: द टायगर्स रिअलम' या पुस्तकाचे सहलेखन केले आहे.

सोनिया गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान अशोक गेहलोत आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतासरा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT