Leena Nagvanshi Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: 23 वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Chhattisgarh Crime: रायगडमधील केलो विहार कॉलनीत राहणाऱ्या लीना नागवंशी या बीकॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडमधील केलो विहार कॉलनीत राहणाऱ्या लीना नागवंशी या बीकॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लीना सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. मृत लीनाचे तिच्या इन्स्टाग्रामवर 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. लीना व्हिडिओ आणि रील बनवायची. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आणि लोकप्रिय होती.

दरम्यान, लीनाचे वडील ग्राहक मंचात वरिष्ठ सहकारी निरीक्षक या पदावर असून ते अंबिकापूर येथे कार्यरत आहेत. मयत लीना केलो विहार कॉलनीत आई आणि भावांसोबत राहत होती. सोमवार 26 डिसेंबर रोजी लीनाची आई बाजारात गेली होती. दुपारी बाजारातून परतल्यानंतर लीना तिच्या खोलीत नसल्याचे त्यांना दिसले, त्यानंतर त्या वरच्या मजल्यावर गेली असता दरवाजा आतून बंद होता. खूप आवाज देऊनही दार न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. यादरम्यान लीनाचा मृतदेह टेरेसवर पाईपला बांधलेल्या चुनरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर तात्काळ लीनाच्या आईने पती आणि पोलिसांना याची माहिती दिली.

दुसरीकडे, पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. त्याचवेळी लीनाने आत्महत्या का केली, याबाबत कुटुंबीयही चिंतेत आहेत. सध्या पोलीस लीनाचा मोबाईल ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच मृत्यूचे कारण समजेल.

नुकतेच, टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या बातमीनेही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता सोशल मीडिया (Social Media) स्टार लीनाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT