Husband arrested in wife murder case after love marriage Dainik Gomantak
देश

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh: उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने वाराणसीमधून एका अशा आरोपीला अटक केली, ज्याच्या गुन्ह्याची कहाणी ऐकून पोलिसही चक्रावले.

Manish Jadhav

Silvassa Suitcase Murder Case Rishabh Singh: उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने वाराणसीमधून एका अशा आरोपीला अटक केली, ज्याच्या गुन्ह्याची कहाणी ऐकून पोलिसही चक्रावले. दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथे स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करुन तिचा मृतदेह सूटकेसमध्ये बंद करुन पसार झालेल्या ऋषभ कुमार सिंह या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेमविवाह केल्यानंतरही घरच्यांच्या विरोधावरुन झालेल्या घरगुती वादातून पतीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले. हत्येनंतर तब्बल दोन महिने हा मृतदेह एका बंद घरात सूटकेसमध्ये पडून होता.

या खळबळजनक घटनेचा खुलासा 3 ऑगस्ट रोजी झाला. सिल्वासा येथील एका भाड्याच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे घर मालकाने घराचे कुलूप तोडले, तेव्हा आतमध्ये प्लास्टिकने गुंडाळलेला आणि सूटकेसमध्ये बंद असलेला एक कुजलेला मृतदेह आढळला. हा मृतदेह ऋषभची पत्नी छोटी उपाध्याय हिचा होता आणि त्याला सुमारे दोन महिने झाले होते.

सिल्वासा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असता, आरोपीचे लोकेशन उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असल्याचे समोर आले. यानंतर सिल्वासा पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफची मदत मागितली आणि त्यांनी तब्बल 1500 किलोमीटर दूर वाराणसीतून ऋषभला बेड्या ठोकल्या.

दुसरीकडे, पोलिस (Police) चौकशीत आरोपी ऋषभने आपला गुन्हा कबूल केला. मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या ऋषभने बिहारच्याच नवादा येथील छोटी उपाध्याय हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे दादरा आणि नगर हवेली येथे भाड्याच्या घरात राहत होते आणि ऋषभ तिथे नोकरी करत होता. मात्र, ऋषभचे कुटुंबीय छोटीला सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. याच कारणावरुन पती-पत्नीमध्ये रोज कडाक्याची भांडणे होत असत.

या त्रासाला कंटाळून 9 जून रोजी ऋषभने घरातच छोटीचा गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर दुर्गंधी बाहेर पसरु नये म्हणून त्याने मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून सूटकेसमध्ये लपवला आणि घराला कुलूप लावून पळ काढला. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी ऋषभ वाराणसी येथे येऊन एका खाजगी ठिकाणी नोकरी करत लपून राहिला होता. मात्र, एसटीएफने गुप्त माहितीच्या आधारे त्याला हुडकून काढले. अटक केल्यानंतर आरोपीला वाराणसीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करुन त्याची ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आली. आता सिल्वासा पोलीस आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT