Shraddha Walker  Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या आई-वडिलांनी घेतली होती आफताबच्या आई-वडिलांची भेट, लग्नाबद्दल...

Shraddha Murder Case Investigation: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Murder Case Investigation: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 मध्ये श्रद्धा वालकरचे आई-वडील आफताब अमीन पूनावालाच्या आई-वडिलांकडे त्यांच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी गेले होते. मात्र आफताबच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला होता. त्यावेळी श्रद्धाच्या आई-वडिलांचा अपमानही त्यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आपल्या घरी परत कधीही येऊ नका किंवा लग्नाबद्दल बोलू नका असे सांगण्यात आले होते.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आफताबने 18 मे रोजी संध्याकाळी त्याची 'लिव्ह-इन पार्टनर' श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौलीच्या जंगलासह विविध ठिकाणी फेकून दिले.

दिल्ली पोलिसांचे पथक अनेक राज्यांत पोहोचले

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात दिल्ली पोलिसांचे पथक मुंबई, गुरुग्राम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पोहोचले असून, मुंबईहून आल्यानंतर श्रद्धा आणि आफताब यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. यादरम्यान काय घडले, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.

पूनावालाचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाईल

तपासाशी संबंधित अधिका-यांनी सांगितले की, आरोपी आफताब अमीन पूनावालाचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाईल आणि वालकरच्या हत्येनंतर तो कोणत्या लोकांच्या संपर्कात होता हे शोधून काढले जाईल. याशिवाय फोनमधून डिलीट केलेला डेटाही परत मिळवला जाईल.

आफताबची नार्को टेस्ट होणार

आरोपी (Accused) आफताब तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर न्यायालयाने आफताबच्या नार्को टेस्टला परवानगी दिली. आता नार्को टेस्टच्या मदतीने आफताबला सत्य उघड करण्यास भाग पाडले जाईल आणि श्रद्धा हत्याकांडाचे सत्य समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT