Shraddha Murder Case: देहरादूनचे खून प्रकरण श्रद्धापेक्षाही भयानक, पत्नीचे केले होते 72 तुकडे

Shraddha Murder Case: दिल्लीतील शाहदरा येथील श्रद्धा हत्याकांडाची देशभर चर्चा होत आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Shraddha Murder Case: दिल्लीतील शाहदरा येथील श्रद्धा हत्याकांडाची देशभर चर्चा होत आहे. आरोपीने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फेकून दिले. लोक याला एक भंयकर घटना म्हणत आहेत. पण या प्रकरणाने देहरादूनच्या प्रसिद्ध अनुपमा गुलाटी हत्या प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी देहरादूनच्या शांत दून व्हॅलीमध्ये श्राद्धापेक्षाही भयानक घटना घडली होती. या घटनेनेही संपूर्ण देश हादरला होता.

2011 मध्ये हत्या करण्यात आली होती

याप्रकरणी अनुपमाचा पती राजेश याने तिची हत्या करुन मृतदेहाचे 72 तुकडे केले होते. त्यानंतर त्याने एक-एक तुकडे फेकून दिले होते. दुसरीकडे, अनुपमाच्या कुटुंबीयांनी बराच वेळ शोधूनही काहीही माहिती न मिळाल्याने अनुपमाचा भाऊ सूरज 12 डिसेंबर 2010 रोजी दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) पोहोचला होता. तिथे गेल्यानंतर त्याला बहिणीच्या हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली. 2011 मध्ये देहरादून पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

Crime News
Shraddha Murder Case: आफताबला फाशी द्या; श्रद्धाच्या वडिलांची दिल्ली पोलिसांकडे मागणी

1999 मध्ये प्रेमविवाह झाला होता

दिल्लीस्थित (Delhi) अनुपमाने 1999 मध्ये राजेश गुलाटीसोबत प्रेमविवाह केला होता. राजेश हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. लग्नानंतर दोघेही 2000 साली अमेरिकेला गेले. तेथून भारतात परतल्यानंतर ते आपल्या दोन मुलांसह प्रकाश नगर, डेहराडून येथे स्थायिक झाले. भारतात परतल्यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. खुनाच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान अनुपमाचे डोके पलंगाच्या कोपऱ्यावर आदळले. यानंतर राजेशने अनुपमाच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला.

Crime News
Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमारचा न्यायालयाने जामीन केला मंजूर

हॉलिवूड चित्रपट पाहून प्लॅन आला

पोलिसांनी राजेशची चौकशी केली असता, हॉलिवूड चित्रपट पाहिल्यानंतर अनुपमाच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते. आधी त्याने अनुपमाची हत्या केली, त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी डीप फ्रीझर विकत घेतला आणि त्यात अनुपमाचा मृतदेह ठेवला. जेव्हा मृतदेह बर्फात गोठला तेव्हा त्याने दगड कापण्याच्या यंत्राने त्याचे 72 तुकडे केले. त्यानंतर त्याने मसुरीच्या जंगलात तुकडे फेकून दिले. दरम्यान, अनुपमाच्या भावाला सत्य समजले. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेशला अटक करुन न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला जन्मठेप आणि 15 लाख रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com