Kavya Karnatac Dainik Gomantak
देश

Kavya Karnatac: नोकरी सोडून कंटेंट क्रिएटर बनण्याचा विचार करताय? इन्फ्लुएन्सरनं दिलेल्या 'या' टिप्स नक्की वाचा

Kavya Karnatac linkedin Post: प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर काव्या कर्नाटक सध्या भारतात चर्चेत आहे. काव्या इंस्टाग्राम, यूट्यूब आणि लिंक्डइनवर पोस्ट करत अनेक विषयांवर आपली मतं मांडत असते.

Sameer Amunekar

पणजी : प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर काव्या सध्या भारतात चर्चेत आहे. काव्या इंस्टाग्राम, यूट्यूब आणि लिंक्डइनवर पोस्ट करत अनेक विषयांवर आपली मतं मांडत असते. शॉर्ट फॉर्म ते लाँग फॉर्म कंटेट प्रवास करणाऱ्या काव्याने लिंक्डइनवर Content Creator होण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना टीप्स दिल्या आहेत.

काव्या सोशल मिडिया म्हणजेच इंस्टाग्राम, यूट्यूबवरून लाखो रूपये कमवते. कंटेंट क्रिएटर म्हणून महिन्याला १५ लाख रुपये कमवते, असं तिनं स्वतःच सांगितलं आहे.

"मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या पहिल्या नोकरीत फक्त ३०,००० रुपये कमवत होते. मात्र, ३० हजाराची नोकरी सोडून मी कंटेंट क्रिएटर बनण्याचा विचार केला. मी कंटेंट क्रिएटर म्हणून महिन्याला आता १५ लाख रुपये कमवते," असं काव्यानं लिंक्डइनवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काव्या सध्या कंटेंट क्रिएटर म्हणून महिन्याला आता १५ लाख रुपये कमावत असली, तरी तिनं कंटेंट क्रिएटरबाबत लिंक्डइन पोस्टच्या माध्यमातून देशातील तरूण-तरूणींना एक मोठा संदेश दिला आहे.

"देशातील तरूण-तरूणींनी नोकरी सोडून कंटेंट क्रिएटर बनण्याचा विचार करू नये. मी आज महिन्याला १५ लाख रुपये कमावत असली, तरी नोकरी सोडून पूर्णवेळ कंटेंट क्रिएशनमध्ये उतरण्याची शिफारस करणार नाही. कंटेंट क्रिएटर हे तुमचं पहिले करिअर नसावं. यशस्वी क्रिएटर असण्याबद्दल मला जे काही माहित आहे, ते मी कॉर्पोरेट जगात असताना शिकले," असं काव्यानं सांगितलं.

मी पोस्टमध्ये पैशांबद्दल बोलते, पण कोणालाही कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या सध्याच्या नोकरीला कमी लेखण्याचा माझा हेतू नसतो. मी माझ्या जीवनाचा प्रवास पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असते. मी एक कंटेंट क्रिएटर आहे, म्हणून यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम, समर्पण आणि नियोजनाची वास्तविकता दाखवू इच्छिते.

माझ्या पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेच पॉकेट एसेसमध्ये निर्माता म्हणून मी पहिली नोकरी केली. ही नोकरी करताना मला अनेक लेखक, निर्माते आणि निर्मात्यांच्या नेटवर्कची ओळख झाली. त्यामुळं मला कंटेंट क्रिएटरबाबत योग्य ज्ञान मिळालं, असं काव्यानं पोस्टमध्ये म्हटलंय.

मला माहित होतं की, जर कंटेंट क्रिएटर बनण्यास यशस्वी झाली नाही, तर अशा प्रतिष्ठित कंपनीतील माझा अनुभव मला दुसरी नोकरी शोधण्यास मदत करेल. शिवाय, माझ्या कॉर्पोरेट नोकरीनं मला शिस्त आणि कामाची नीतिमत्ता शिकवली. जी कौशल्यं माझ्या कंटेंट निर्मितीच्या प्रवासात खूप महत्त्वाची होती, असं काव्यानं सांगितलं.

कंटेंट तयार करणं म्हणजे फक्त कल्पना घेऊन येणं एवढेंच नाही, तर त्यात स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंग, अपलोडिंग आणि ब्रँड डीलची वाटाघाटी करणं हे सगळं समाविष्ट असतं.

आज, माझ्या kk.create पेजचे १.९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु जर माझ्याकडे आर्थिक मदत आणि माझ्या पहिल्या नोकरीमुळं मला आत्मविश्वास मिळाला नसता, तर मी एवढं मोठं यश मिळवू शकले नसते. माझ्या कॉर्पोरेट अनुभवानं मला माझ्या क्षमतांमध्ये आत्मविश्वासाची पातळी विकसित करण्यास मदत केली,, जी कंटेंट निर्मितीमध्ये मोठी जोखीम घेण्याची वेळ आली तेव्हा महत्त्वाची होती.

कंटेंट क्रिएटर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तयारी करावी लागते. झेप घेण्यापूर्वी, तुम्हाला तुमचा पाया मजबूत बांधण्याची आवश्यकता असते, असं काव्यानं सांगितलं.

काव्या कर्नाटक नेमकी आहे कोण?

काव्या कर्नाटक ही उत्तराखंडमधील नैनीताल येथील 26 वर्षीय कंटेंट क्रिएटर आहे. ती विविध विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओज तयार करते. इन्स्टाग्रामवर तिचे 1.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जुलै 2024 मध्ये काव्याला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे प्रमोशन करण्यासाठी ₹3.6 लाखांची ऑफर मिळाली होती, मात्र तिनं ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर ती जास्तच चर्चेत आली होती.

कंटेंट क्रिएटर बनण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

आजच्या डिजिटल युगात, कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्ही तुमची सर्जनशीलता जगासमोर मांडू शकता, यात तुम्ही तुमचं करियरही तयार करू शकता. पण, कंटेंट क्रिएटर बनणं तसं सोपं नाही. यामध्ये तुमची आवड, तुमचं ऑडियन्स आणि तुमची कंटेंट तयार करण्याची क्षमता या सगळ्यांचा समावेश होतो.

तुम्हाला काय आवडतं: तुम्हाला कोणत्या विषयात सर्वात जास्त रस आहे? तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतं का, किंवा तुम्हाला प्रवास करायला आवडतं का? अशा कोणत्याही एकाच विषयावर तुम्ही कंटेंट तयार करू शकता.

तुम्ही कोणत्या विषयात हुशार आहात? तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता? किंवा तुमच्याकडे काही खास कौशल्य आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करूनही तुम्ही कंटेंट क्रिएटर बनू शकता.

ऑडियन्स: तुमचं ऑडियन्स कोण आहे? त्यांची वय किती आहे? त्यांच्या आवडी काय आहेत? हे आधी ठरवा. त्यांच्या गरजा काय आहेत: तुमचं ऑडियन्स कोणत्या प्रकारचं कंटेंट पाहतंय? त्यांना कोणती माहिती हवी आहे? या सर्वाची माहिती असणं आवश्यक आहे.

सोशल मीडिया: इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर तुमची प्रोफाइल तयार करा आणि नियमितपणे कंटेंट पोस्ट करा. तुमची स्वतःची वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करा, ज्यामुळं तुम्ही तुमचं कंटेंट एकाच जागी ठेवू शकता आणि तुमच्या ऑडियन्ससोबत चांगल्या प्रकारे शेअर करू शकता.

कंटेंटची गुणवत्ता: तुमचा कंटेंट आकर्षक बनवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करा. तुमच्या ऑडियन्सला अशी माहिती द्या, जी ऑडियन्सला उपयुक्त असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT