There is no Blood Bank in 63 districts of the country Dainik Gomantak
देश

Shocking: देशातील 63 जिल्ह्यांमध्ये एकही Blood Bank नाही

केंद्रीय आरोग्यमंत्री (Minister of Health) मनसुक मांडविया यांनी लोकसभेत (Lok Sabha) ही माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

देशात एकूण 3,500 परवानाकृत रक्तपेढया आहेत. परंतु 63 जिल्ह्यांमध्ये (districts) अजूनही रक्तपेढ्या (Blood Banks) अस्तीत्वात नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री (Minister of Health) मनसुक मांडविया यांनी शुक्रवारी लोकसभेत (Lok Sabha) ही माहिती दिली.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी स्थापन करण्यासाठी कोणती पावले उचलली किंवा प्रास्ताविक केल्या आहेत याची माहिती देतांना मांडविया म्हणाले की राष्ट्रीय रक्तपेढी (Blood Banks) धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढी (Blood Banks) असणे आवश्यक आहे, तर फक्त शहरी भागातच ब्लड बँक (Blood Banks) असून चालणार नाही तर ग्रामीण भागात देखील ब्लड बँक असणे आवश्यक आहे.

हे धोरण रक्तसंक्रमण सेवेसाठी केंद्र आणि स्पोकद्वारे समर्थन करते. ज्या केंद्रामध्ये रक्त गोळा केले जाते आणि प्रक्रिया केली जाते अशा केंद्रात ते स्पोकद्वारे वितरित केले जाते. या लहान रक्तपेढया (Blood Banks) किंवा रक्तसाठा (Blood supply) केंद्र आहेत. आरोग्यमंत्र्यांनी (Minister of Health) लेखी उत्तरात संसदेला सांगितले की, "देशात 63 जिल्ह्यात रक्तपेढी (Blood Banks) नाही"

मांडविया म्हणाले,"विविध प्रशासकीय कारणास्तव राज्य सरकार (State Government) नवीन जिल्हा तयार करतात. तथापि, अशा जिल्ह्यांमध्ये रक्ताची गरज शेजारच्या जिल्ह्यातील रक्त साठवण केंद्राद्वारे पूर्ण केली जाते, जी सामुदायिक आरोग्य केंद्र (Health Center) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (Primary Health Center) बनविली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT