Pegasus Spyware Issue: सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी

या पेगासेस(Pegasus Spyware Issue) प्रकरणात, ज्येष्ठ पत्रकार एन राम यांची याचिका वकील कपिल सिब्बल(Kapil Sibal) यांनी सीजेआयसमोर(CBI) ठेवली होती
Pegasus Issue: Supreme Court to hear the case next week
Pegasus Issue: Supreme Court to hear the case next weekDainik Gomantak

देशात गाजत असलेल्या पेगासेस(Pegasus) हेरगिरी(Pegasus Spyware Issue) प्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहे . या प्रकरणात, ज्येष्ठ पत्रकार एन राम यांची याचिका वकील कपिल सिब्बल(Kapil Sibal) यांनी सीजेआयसमोर(CBI) ठेवली होती आणि याबाबतची सुनावणी लवकर घ्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयकडे(Supreme Court) केली होती. CJI ने पुढील आठवड्यात सुनावणीचे आश्वासन दिले असून याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.(Pegasus Issue: Supreme Court to hear the case next week)

स्मार्ट फोनच्या या युगात, खाजगी संभाषण किंवा माहितीचे संरक्षण करण्यासाठी कायदा सुधारावा देशात 2007 मध्ये इंडियन टेलीग्राफ अ‍ॅक्ट 1885 च्या दुरुस्तीनंतर फोन टॅपिंगबाबत नियम बनविण्यात आले होते . या अंतर्गत देशाचे संरक्षण किंवा गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्याच्या बाबतीत उच्च स्तरावरील परवानगीवर फोन टॅपिंग करता येते.मात्र त्यासाठी योग्य परवानग्या घेणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एखाद्या राज्यात गृहसचिव स्तरावरून परवानगी मिळाल्यानंतरच , फोन टॅप केला जाऊ शकतो मात्र ती ही 60 दिवसांसाठीच.आणि हे जास्तीत जास्त 180 दिवसच चालू ठेवता येते.

Pegasus Issue: Supreme Court to hear the case next week
Government Pension: सव्वा लाखांपर्यंत मिळणार मासिक कौटुंबिक पेन्शन

विशेष म्हणजे हा कायदा स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्समध्ये प्रविष्ट केलेल्या माहितीची चोरी, कॉल किंवा संदेशाद्वारे केलेली संभाषणे लीक होण्याबाबत स्वतंत्रपणे काहीही सांगत नाही.

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि संबंधित नियमांमध्ये इंटरनेट डेटाच्या संरक्षणाविषयी बोलले गेले आहे. परंतु अशा बाबींकडे लक्ष देण्यासाठी अद्याप डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना झालेली नाही. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सरकारला डेटा संरक्षणाची शिफारस सादर केली होती .मात्र त्यावरही अद्याप निर्णय झाला नाही.

यावर आधारित, सरकारने वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, 2019 वैयक्तिक डेटा संरक्षित करण्यासाठी संसदेत ठेवले. या अंतर्गत, डेटा संरक्षण प्राधिकरणाची स्थापना केली जाणार आहे, परंतु हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीकडे प्रलंबित आहे.

Pegasus Issue: Supreme Court to hear the case next week
जम्मू काश्मीरात ग्रेनेड हल्ला

जरी डेटा संरक्षणावर स्पष्ट कायद्याचा अभाव आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीला स्पायवेअरद्वारे हेरगिरी केली गेली हे निश्चितपणे माहित असेल. वैयक्तिक माहिती लीक झाल्यामुळे त्याचे काही नुकसान झाले असेल तर तो पोलिसात तक्रार देऊ शकतो. पोलिसांची सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करू शकते. गरज भासल्यास पोलीस NSO, पेगासस बनवणाऱ्या कंपनीला नोटीस पाठवू शकतात. तथापि, हे सर्व घडण्याआधी, पोलिसांना सध्या उपलब्ध असलेल्या कायद्यांच्या आधारे एखादा खटला सुरू आहे की नाही हे पाहावे लागते.

या प्रकरणात लोकांना खरोखर हेरगिरी केली गेली आहे की नाही हे स्पष्ट नाही. जर असे झाले असेल तर सरकारने ते केले की कोणत्या अधिकाऱ्याने केली ? किंवा खाजगी व्यक्तीने स्वतःच्या पैशाने स्पायवेअर विकत घेतले आणि ते वापरले? या विषयावर कायद्याचा अभाव असल्याने. अशा परिस्थितीत कोणताही बाधित व्यक्ती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. न्यायालयाने सरकारकडून अहवाल मागवावा, अशी मागणी केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com