Government Pension: सव्वा लाखांपर्यंत मिळणार मासिक कौटुंबिक पेन्शन

“कौटुंबिक पेन्शनशी संबंधित 75 महत्त्वपूर्ण नियम” या निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन कल्याण विभागाच्या मालिकेचा भाग म्हणून हे तपशील जाहीर करण्यात आले आहेत.
Government Pension
Government PensionDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: निवृत्ती वेतन (Government Pension) व पेन्शनर्स कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या (Central government) कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मासिक कौटुंबिक पेन्शन (monthly family pension) म्हणून 1.25 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. (How Central government family pensioners can get Rs 1.25 lakh as monthly pension)

कोविड काळात लोकांना आपल्या कुंटूंबियांना जगवण्यासाठी आणि त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची गरज भागविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यातच सरकारने ही योजनी जाहीर करून नोकरीतून निवृत्त झालेल्यांना एक प्रकारचा दिलासाच दिला आहे. कोविड काळात लोकांचा रोजगार गेला आहे. अशातच वृद्ध लोकांच्या आणि निवृत्त झालेल्यांना तर पेन्शनचाच आधार आहे.

Government Pension
इंजिनिअर व्हायचंय! इंग्रजीचा प्रॉब्लेम,आता मातृभाषेतून घेता येणार इंजिनिअरिंची पदवी
  • या योजनेत शासनाच्या अंतर्गत जास्तीत जास्त कुटुंब पेन्शनची रक्कम दरमहा 1,25,000 रुपये आहे म्हणजे सरकारी नोकरीमधील वेतनाच्या 50 टक्के वेतना एवढी. आणि त्याचबरोबर वेळोवेळी स्वीकार्य म्हणून महागाई भत्ता (DR), देण्यात येणार आहे.

  • म्हणून, जर कोणी या योजनेसाठी पात्र असेल आणि या नियमांत बसत असेल तर त्याला दरमहा 1.25 लाख रुपये कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.

  • दरम्यान, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागाच्या तपशीलांनुसार, सरकारच्या अंतर्गत किमान कुटुंब निवृत्तीची रक्कम दरमहा 9,000 रुपये आहे.

वृद्ध निवृत्तीवेतनधारकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “कौटुंबिक पेन्शनशी संबंधित 75 महत्त्वपूर्ण नियम” या निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन कल्याण विभागाच्या मालिकेचा भाग म्हणून हे तपशील जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com