Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Delhi Acid Attack: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लक्ष्मी बाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला (Acid Attack) झाला.

Manish Jadhav

Delhi Acid Attack: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लक्ष्मी बाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला (Acid Attack) झाला. रविवारी (26 ऑक्टोबर) दुपारी सुमारे 11 वाजून 30 मिनिटांनी ही दुर्दैवी घटना घडली. जखमी विद्यार्थिनीला तात्काळ दीप चंद बंधु रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ॲसिड हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. ही पीडित विद्यार्थिनी लक्ष्मी बाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

दरम्यान, पीडिता अशोक विहारमधील एका खासगी क्लाससाठी गेली होती. क्लासवरुन कॉलेजकडे जात असताना तिचा जुना परिचित जितेंद्र हा आपल्या साथीदारांसह ईशान आणि अरमान यांच्यासोबत मोटारसायकलवरुन तिथे आला. याचवेळी, आरोपींनी तिच्यावर ॲसिड हल्ला केला आणि त्यानंतर तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले.

पोलिसांना (Police) मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आणि त्याचे दोन साथीदार ईशान आणि अरमान एकाच बाईकवर स्वार होऊन आले होते. हल्ला करण्याच्या वेळी ईशानने कथितरित्या अरमानला ॲसिडची बाटली दिली, ज्यानंतर अरमानने विद्यार्थिनीवर ॲसिड फेकले. पीडितेने आपला चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्यात तिचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले.

परिचित तरुणावर संशय

पीडितीने पोलिसांना सांगितले की, आरोपी जितेंद्र तिचा पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांच्यात जोरदार भांडणही झाले होते. या भांडणातूनच हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच क्राइम टीम आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या टीमने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. पीडितेचे जबाब आणि जखमांचे स्वरुप लक्षात घेऊन बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दावा केला की, या जघन्य गुन्ह्यासाठी आरोपींवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT