Delhi Crime: दिल्लीत भांडी व्यापाऱ्याचा खून करणारा वॉन्टेड गोलू गोव्यात करतोय मौजमजा! इन्स्टाग्राम पोस्टने उडवली खळबळ

Wanted Shooter Found In Goa: दिल्लीत भांडी व्यापाऱ्याचा खून करणारा वॉन्टेड आरोपी गोव्यात मौजमजा करत असल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे.
Wanted Shooter Found In Goa
Delhi CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Wanted Accused in Delhi Trader Murder Case Spotted Partying in Goa

दिल्लीत भांडी व्यापाऱ्याचा खून करणारा वॉन्टेड आरोपी गोव्यात मौजमजा करत असल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीतील भांडी व्यापारी सुनील जैन यांच्या हत्येतील वॉन्टेड शूटर सचिन उर्फ ​​मुकेश उर्फ ​​गोलू याचे इन्स्टाग्राम अकाउंट शनिवारी (22 फेब्रुवारी) रात्री ॲक्टिव्ह आढळले. यादरम्यान गोव्यात एन्जॉय करतानाचे त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड झालेले पाहायला मिळाले.

दिल्ली पोलिसांची शोध मोहीम

दिल्ली पोलिस गेल्या अडीच महिन्यांपासून गोलू आणि शूटर नवीन कसानाचा शोध घेत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ईशान्य जिल्ह्यात तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाला अटक केली, जो सध्या कोठडीत आहे. दुसरीकडे मात्र, गोलू आणि नवीन कसाना दोघेही परदेशात पळून गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Wanted Shooter Found In Goa
Goa Crime: कुत्र्याच्या वादातून महिलेच्या अंगावर गाडी घालणाऱ्या दीपन बत्राला न्यायालयीन कोठडी; मेरी यांच्यावर अंत्यसंस्कार

गोलूने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो अपलोड केले

दरम्यान, शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोलूने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो अपलोड केले. यातील एक फोटो गोव्यातील (Goa) ऐतिहासिक आग्वाद मध्यवर्ती कारागृहाबाहेरचा दिसला. या कारागृहाचे आता संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. असे मानले जाते की, त्याने अपलोड केलेले सर्व फोटो गोव्यातील आहेत. मात्र, फोटो कधी काढले याबाबत त्याने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही. पोलिस सूत्रानुसार, गोळीबार करणारा गोलू हा गँगस्टर हाशिम बाबाची पत्नी झोया हिच्या जवळचा होता. त्याला स्पेशल सेलने 270 ग्रॅम हेरॉइनसह अटक केली होती. तो ईशान्य जिल्ह्यात तैनात असलेल्या अटक केलेल्या एसआयच्याही संपर्कात होता.

विविध आरोपाखाली अटक

अशा परिस्थितीत, शनिवारी अचानक गोलूने इन्स्टाग्रामवर (Instagram) त्याचे फोटो पोस्ट करुन एकच खळबळ उडवून दिली. स्पेशल सेल आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहेत. पोलिस सूत्रानुसार, एसआयला गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगाराला आश्रय देणे या आरोपाखाली अटक करण्यात आली. तो आरोपी गोलूच्याही संपर्कात होता. दुसरीकडे, हाशिम बाबा गँगच्या शूटर्सच्या मुसक्या आवळणारी स्पेशल सेलची टीम गोलूला पकडण्यात मात्र अपयशी ठरली.

Wanted Shooter Found In Goa
Goa Crime: कुत्र्याच्या वादातून महिलेच्या अंगावर गाडी घालणाऱ्या दीपन बत्राला न्यायालयीन कोठडी; मेरी यांच्यावर अंत्यसंस्कार

हत्येमागील हेतू काय होता?

आतापर्यंतच्या पोलिस तपासात असे दिसून आले की, 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीच्या रात्री बिहारी कॉलनीतील रहिवासी आकाश शर्मा आणि त्याचा अल्पवयीन पुतण्या ऋषभ यांची हत्या करण्यात आली होती. हे काम परदेशात बसलेल्या रशीद केबलवालाने केले. या प्रकरणात, मृत आकाशच्या एका अल्पवयीन नातेवाईकाला अटक करण्यात आली. आकाश सट्टेबाजीत सहभागी होता. गोलूसोबत तोही एका प्रकरणात आरोपी होता. आकाशच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गोलूला अल्पवयीन मुलाच्या वडिलांची हत्या करायची होती. चुकीच्या ओळखीमुळे 7 डिसेंबर रोजी सुनील जैन यांची हत्या करण्यात आली.

Wanted Shooter Found In Goa
Goa Crime: बनावट हॉटेल्‍स वेबसाईट्स रॅकेटचा पर्दाफाश! अनेक ग्राहकांची फसवणूक; मध्यप्रदेशच्या तरुणाला अटक

गुन्हेगारांची पार्श्वभूमीवर

गेल्या वर्षी गोलूने प्रीत विहार आणि वेलकममध्ये 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 16 सप्टेंबर रोजी गोकुळपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मकोका प्रकरणातही बाबाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि चोरी असे 18 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मकोकाचा खटला लागू झाल्यापासून तो फरार आहे. दुसरा शूटर लोणीच्या जावली गावातील नवीन कसाना आहे. 2021 पासून पॅरोलवरुन सुटल्यानंतर तो फरार आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी गीता कॉलनीत झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर मकोका आणि हत्येसह 18 गुन्हे दाखल आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com