Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime: शाहरुखने बनवला हिंदू तरुणीचा न्यूड VIDEO, सेक्ससाठी करायचा ब्लॅकमेल; परम शर्मा...!

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 22 वर्षीय तरुणी मीडियासमोर आली.

Manish Jadhav

Delhi Crime: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 22 वर्षीय तरुणी मीडियासमोर आली. पांढऱ्या स्कार्फने चेहरा झाकलेल्या या मुलीने आपल्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले.

तिने सांगितले की, 'शाहरुख खान नावाच्या एका व्यक्तीने परम शर्मा म्हणून तिच्याशी मैत्री केली.' मैत्रीनंतर शाहरुखने पीडितेचे अनेक न्यूड व्हिडिओ बनवले. त्यानंतर, त्याने तिला सेक्ससाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. करावल नगर परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपी शाहरुखला अटक केली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने शुक्रवारी ताबडतोब पोलीस ठाणे गाठले. शाहरुखने ऑक्टोबर 2020 मध्ये ओळख लपवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेला जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचे खरे नाव कळले होते.

जेव्हा तिला कळले की, तीने ज्या परम शर्माशी मैत्री केली आहे, तो परम नसून शाहरुख आहे. इथूनच शाहरुखने तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा खेळ सुरु केला.

वास्तविक, शाहरुखने पीडितेचे अनेक न्यूड व्हिडिओ बनवले. पोलिसांनी सांगितले की, शाहरुखने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलदरम्यान पीडितेचे अनेक न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. याशिवाय, शाहरुखकडे पीडितेचे अनेक न्यूड फोटोही होते. शाहरुख पीडितेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचा.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी (Accused) शाहरुख सीलमपूर परिसरातील एका टेलरिंगच्या दुकानात टेलरचे काम करतो. ओळख लपवून त्याने पीडितेशी मैत्री केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेशी इंस्टाग्रामवर मैत्री केली होती.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा कोणताही कोन नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

SCROLL FOR NEXT