Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली, गाडीखाली अडकलेल्या व्यक्तीला 300 मीटरपर्यंत...!

Delhi Crime Latest Updates: व्हीव्हीआयपी परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेचा पर्दाफाश झाला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Man Dragged for Around 300 meters in Delhi: दिल्लीत पुन्हा एकदा कांजवालासारखी घटना घडली आहे. कार चालवत असलेल्या आरोपीने रिक्षाचालकाला धडक दिल्यानंतर सुमारे 300 मीटरपर्यंत ओढत नेले.

व्हीव्हीआयपी परिसरात ही घटना घडल्याने पोलिसांच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या पीडितेला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

फिरोजशाह रोडवर ही घटना घडली

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील सर्वात व्हीआयपी क्षेत्र असलेल्या फिरोजशाह रोडवर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.

त्यावेळी एका स्विफ्ट कारने 25 वर्षीय रिक्षाचालक मनोजला जोरदार धडक दिली. घटनेच्या वेळी मनोज आपल्या रिक्षातून घरी जात होता. ही धडक एवढी जोरदार होती की, रिक्षा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

त्याचवेळी मनोज अचानक स्विफ्ट गाडीखाली आला. असे असतानाही गाडी थांबविण्याऐवजी गाडीत बसलेल्या चालकाने सुमारे 300 मीटरपर्यंत गाडी पळवली.

पुढच्या सिग्नलला तो कसा तरी पकडला गेला आणि रिक्षाचालक मनोजला गाडीखालून बाहेर काढण्यात आले.

Crime News
Manish Sisodia Delhi Excise Case: मनीष सिसोदिया यांना मोठा झटका, न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ!

पोलिसांनी घटनास्थळ सील केले

पोलिसांनी (दिल्ली पोलिसांनी) तात्काळ रिक्षाचालकाला आरएमएल रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

कांजवाला घटनेमुळे संपूर्ण देशात दिल्ली पोलीसांची नाचक्की झाली होती, हे लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी पाठवले. पथकाने तात्काळ संपूर्ण गुन्ह्याची जागा सील केली. तसेच तेथून पुरावे गोळा करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Delhi Trilokpuri Crime
gang rape case involving minor girl in Odisha
Delhi Metro Kalkaji station viral video
Curchorem Crime Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com