Delhi Crime News: बायको, मुलीची हत्या करून स्वत: घेतला गळफास; गुगलवर सर्च केली आत्महत्येबाबत माहिती

संशयित आरोपी दिल्ली मेट्रोमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतो.
Delhi Crime News
Delhi Crime NewsDainik Gomantak

Delhi Crime News: दिल्लीतील शाहदरा भागात एका व्यक्तीने पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. दिल्ली मेट्रोमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या 45 वर्षीय सुशीलने त्याची 40 वर्षीय पत्नी अनुराधा आणि 06 वर्षांची मुलगी अदिती यांची घरातच कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर सुशीलने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज तकने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चाकू जप्त केला. पोलिसांनी घरात ठेवलेला कॉम्प्युटरही तपासला आहे, ज्यामध्ये सुशीलने गुगलवर How To Hang असे शोधले होते. संगणकावर असे सर्च केल्यानंतर सुशीलने आत्महत्या केली. सुशीलने पत्नी मुलीची हत्या का केली? त्याचा तपास सध्या सुरू आहे.

सुशीलने त्याच्या 13 वर्षाच्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला मात्र, तो बचावला असून, सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Delhi Crime News
Konkani Circular In UK: थेट ब्रिटनमध्ये झळकले कोकणी भाषेतील परिपत्रक, कारण काय जाणून घ्या

पोलिसांनी तत्काळ कॉलची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले, जिथे त्यांना तीन जणांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माजी विनोद नगर डेपोमध्ये डीएमआरसीमध्ये देखभाल पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचवेळी पत्नी अनुराधा आणि मुलीच्या मृतदेहावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहेत.

सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळाची पाहणी करत आहेत. मृत सुशीलने कुटुंबीयांची हत्या केली, नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक दृष्‍टीने दिसते. त्याने आपल्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला पण तो वाचला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घर सील करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com