Kangana Ranaut  Dainik Gomantak
देश

Kangana Ranaut: कंगना रनौतला मोठा झटका! 'शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकां'वरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चालणार देशद्रोहाचा खटला; आता कोर्टात होणार फैसला

Kangana Ranaut Farmers Controversy: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Kangana Ranaut Sedition Case: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल तिच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे. राजीव गांधी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट रमा शंकर शर्मा यांनी बुधवारी (12 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली.

यापूर्वी, न्यायालयातून (Court) याचिका फेटाळल्यानंतर ऍडव्होकेट शर्मा यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका स्वीकारल्यानंतर कंगनावर आता देशद्रोहाचा खटला चालण्याची शक्यता आहे.

नेमकं काय प्रकरण?

ऍडव्होकेट शर्मा यांनी एएनआयशी संवाद साधताना या प्रकरणाची माहिती दिली. ऍडव्होकेट शर्मा यांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी आग्रा येथील स्थानिक न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला होता, तसेच महात्मा गांधींसह स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध देशद्रोही आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोप याचिकेत आहे. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने अनेकवेळा नोटीस पाठवूनही कंगना रनौत किंवा तिच्या कोणत्याही प्रतिनिधीकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद आला नाही. "न्यायालयाने तिला तिची बाजू मांडण्याची आणखी एक संधी दिली होती, परंतु तिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही," असे शर्मा यांनी सांगितले.

याचिका फेटाळली, पण पुनर्विचारानंतर पुन्हा सुरु

या प्रकरणात कंगनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने काही काळानंतर ही याचिका फेटाळण्यात आली होती. कंगनाने प्रतिसाद न दिल्याने 9 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने पोलिसांना याचिकाकर्त्याने दिलेल्या तक्रारी आणि पुराव्यांच्या आधारावर सविस्तर रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले होते. तर शर्मा यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर पुरावे न्यायालयात जमा केले होते. मात्र, कंगनाकडून उत्तर न मिळाल्याने आणि प्रक्रियेतील विलंबांमुळे ही याचिका नंतर फेटाळण्यात आली होती.

"कंगना रनौतकडून कोणतेही उत्तर किंवा कायदेशीर तरतूद सादर केली गेली नाही, ज्यामुळे न्यायालयाने प्रकरण बंद केले. पण मी यावर पुनर्विचार याचिका दाखल केली, जी आता न्यायालयाने स्वीकारली आणि सुनावणी पुन्हा सुरु करण्यात आली," असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

पुन्हा सुनावणी होणार

ऍडव्होकेट शर्मा यांनी सांगितले की, त्यांची पुनर्विचार याचिका प्रकरणाला पुन्हा उघडण्याची आणि आरोपांची सखोल न्यायिक चौकशी सुनिश्चित करण्याची मागणी करते. "न्यायालयाने हे प्रकरण नवीन सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. मला खात्री आहे की, न्याय नक्कीच मिळेल," असे शर्मा म्हणाले. सूत्रांनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी आगामी काही आठवड्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.

कंगना रनौत यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) राजकीय वक्तव्यांमुळे आणि टिप्पण्यांमुळे यापूर्वीही अनेकवेळा कायदेशीर आणि सार्वजनिक वाद निर्माण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर रस्त्यात जीवाशी खेळ! ट्रकच्या चाकांमधून बाईक काढणाऱ्या तरुणाचा थरार व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले...

Goa ZP Election: 'युतीचा निर्णय उद्या होणार', जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; 50 मतदारसंघांतून अर्ज दाखल

Vijay Devarakonda: कोकणवासियांनो! विजय देवरकोंडा आलाय तुमच्या गावात, 'रावडी जनार्दन' कोकणच्या प्रेमात

Khawaja Asif: पाकड्यांची भारताला पुन्हा युद्धाची धमकी, पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळले; म्हणाले, "अल्लाह आमची मदत करेल" VIDEO

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरण, आरोपी जेनिटो कार्दोजचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ

SCROLL FOR NEXT