Jayalalitha Sasikala  Dainik Gomantak
देश

Jayalalithaa Death Probe: जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकलांवर आरोप

चौकशी आयोग म्हणतो, त्यांच्यात चांगले संबंध नव्हते; डॉक्टर, अधिकाऱ्यांवरही संशय, सविस्तर चौकशीची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Jayalalithaa Death Probe:तामिळनाडुच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युविषयी चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल आता सार्वजनिक करण्यात आला आहे. या अहवालात जयललिता यांच्या जवळच्या सहकारी शशिकला यांच्यासह एक वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांना दोषी ठरवले गेले आहे.

जयललिता यांच्या मृत्युच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश ए. अरुमुघसामी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली गेली होती. या समितीने 500 पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. अहवालात म्हटले आहे की, जयललिता आणि शशिकला यांच्यातील संबंध चांगले नव्हते. त्यांच्या मृत्युची सविस्तर चौकशी केली जावी. नैसर्गिक मृत्यू न मानता एक गुन्हा म्हणून नोंद करून याची चौकशी केली जावी.

अहवालात म्हटले आहे की, व्ही. के. शशिकला या जयललिता यांच्या जवळच्या सहकारी होत्या. त्या जयललितांसमवेत त्यांच्याच घरात राहत होत्या. जयललिता आजारी पडल्यापासून त्यांच्या मृत्युपर्यंत शशिकला त्यांच्यासोबत होत्या.

डॉ. के. एस. शिवकुमार हे जयललितांचे खासगी डॉक्टर होते. त्यांच्यावरही आरोप केला गेला आहे. राधाकृष्णन हे तत्कालीन आरोग्य सचिव होते, ते जयललिता यांच्या आरोग्याची काळजी घेत होते, त्यांच्यावरही संशय व्यक्त केला गेला आहे. सी. विजयभास्कर हे तत्कालीन आरोग्यमंत्रीही जयललिता यांच्या निकटचे मानले जात होते. ते बुलेटिनद्वारे हेल्थ अपडेट देत होते. त्यांनाही चौकशी समितीने संशयाच्या भोवऱ्यात उभे केले गेले आहे.

जयललिता या मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले होते. चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्या दोन महिने रूग्णालयात होत्या.

जयललितांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुक पक्षाने शशिकला यांची विधीमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली होती. 1991 मध्ये जयललिता जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा शशिकलांशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर दोघींची जोडी तामिळनाडूच्या राजकारणात अम्म आणि चिन्नमा म्हणून प्रसिद्ध झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT