The Kashmir Files 2: काश्मिरी पंडितांवरील अत्याचार पुन्हा येणार प्रेक्षकांसमोर

'द काश्मिर फाईल्स'चा सीक्वेल पुढील वर्षी रीलीज होण्याची शक्यता, विवेक अग्निहोत्री यांचे ट्विटरवर उत्तर
Vivek Agnihotri, The Kashmir Files
Vivek Agnihotri, The Kashmir FilesDainik Gomantak
Published on
Updated on

The Kashmir Files 2: काश्मिरी पंडितांच्या अत्याचारावर आधारीत 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाने देशात मोठी चर्चा घडवून आणली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईदेखील केली होती. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे या चित्रपटाचा सीक्वेल 'द काश्मिर फाईल्स २' घेऊन येत आहेत. नुकतेच त्यांनी या सीक्वेलच्या रीलीजबाबत माहिती दिली.

Vivek Agnihotri, The Kashmir Files
Diwali Release 2022: 'हे' चित्रपट मोडतील बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड !

काश्मिरी पंडितांच्या अत्याचाराचीच कहाणी असलेला हा सीक्वेल पुढील वर्षात रीलीज होणार आहे. अग्निहोत्री यांच्या 'द काश्मिर फाईल्स'ने अनेकांना हादरवून टाकले होते. त्यामुळे तेव्हापासूनच चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार, याची विचारणा केली जात होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. 15 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जवळपास 340 कोटी रूपयांची कमाई केली होती.

Vivek Agnihotri, The Kashmir Files
Urfi Javed थोडक्यात बचावली... नृत्य करताना झोपाळ्यावरून पडली

ट्विटर एका युजरने काश्मिरी पंडितांवर अत्याचार सुरूच असून सरकार झोपले आहे, असे ट्विट केले होते. हे ट्विट श्रेयांश त्रिपाठी यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग करत, यावर काश्मिर फाईल बनवणार का? असा सवाल केला होता.

त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमधून उत्तर दिले. आणि विवेकच्या उत्तराने अनेकांना खुष करून टाकले. विवेकने 'द काश्मिर फाईल्स २' विषय़ी लिहिले आहे की, ...होय काम सुरू आहे. 2023 च्या मध्यापर्यंत वाट पाहा. विवेकच्या या ट्विटने हे स्पष्ट झाले आहे की, 2023 च्या जून-जुलैपर्यंत 'द काश्मिर फाईल्स २' रीलीज होऊ शकतो. यातून पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांची वेदना समोर येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com