Sanju Samson Dainik Gomantak
देश

Sanju Samson: आशिया कपपूर्वी 'संजू'चा धमाका! एका चेंडूत चोपल्या 13 धावा; कसं आहे शक्य? Watch Video

Sanju Samson 13 runs: फ्री-हिटवर सॅमसनने पुन्हा सलग दोन षटकार ठोकले आणि एकाच वैध चेंडूत १३ धावा मिळवल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज जोसेफने त्यानंतर परत येत दोन डॉट बॉल टाकले.

Sameer Panditrao

केरळ: संजू सॅमसनने अविश्वसनीय कामगिरी करत केवळ एका चेंडूत तब्बल १३ धावा चोपल्या. मंगळवारी (२६ ऑगस्ट) केरळ क्रिकेट लीग (KCL) सामन्यात कोची ब्लू टायगर्सकडून खेळताना सॅमसनने पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर सिजोमन जोसेफला षटकार ठोकला.

पंचांनी तो नो-बॉल घोषित केला, ज्यामुळे पुढचा चेंडू फ्री-हिट होता. त्या फ्री-हिटवर सॅमसनने पुन्हा सलग दोन षटकार ठोकले आणि एकाच वैध चेंडूत १३ धावा मिळवल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज जोसेफने त्यानंतर परत येत दोन डॉट बॉल टाकले. त्याने एकूण तीन षटकांत ३२ धावा खर्च केल्या आणि त्याला एकही बळी मिळाला नाही. मागील सामन्यात शतक ठोकणाऱ्या सॅमसनने आपला फॉर्म कायम ठेवला.

संजू ४६ चेंडूत तब्बल ८९ धावा करून बाद झाला. १९३.४८ च्या स्ट्राईक रेटने खेळताना सॅमसनने ९ षटकार आणि ४ चौकार ठोकले. २०२५ आशिया कपपूर्वी त्याने पुन्हा एकदा दमदार फॉर्म मिळवला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच टी-२० सामन्यांत त्याच्या खात्यात केवळ ५१ धावा जमा झाल्या होत्या.

आशिया कपमध्ये अंतिम संघात स्थान मिळेल का?

आशिया कपमध्ये सॅमसन अंतिम ११ मध्ये आपले स्थान टिकवू शकेलच असे नाही. अभिषेक शर्मा सलामीला उतरणार हे निश्चित असून शुभमन गिलही अंतिम ११ मध्ये परतणार आहे.

उपकर्णधार नेमलेला शुभमन गिल सॅमसनची जागा घेईल अशी शक्यता आहे. सलामीला सॅमसनसाठी जागा नाही. दुसरा यष्टीरक्षक जितेश शर्मा हा विशेषत: फिनिशर आहे, तर सॅमसन हा ओपनर म्हणून तज्ज्ञ आहे. त्यामुळे शुभमन गिलचा अंतिम संघात पुनरागमन आणि जितेशची उपस्थिती यामुळे सॅमसनचे स्थान धोक्यात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT