Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Rohit Sharma Matches: भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानापासून दूर आहे. आगामी एशिया कपमध्ये तो खेळताना दिसणार नाही, कारण या वेळी एशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे
Rohit Sharma celebrating IPL 2025 record | हिटमॅन रोहित IPL 2025 विक्रम
Rohit Sharma celebrating IPL 2025 record | हिटमॅन रोहित IPL 2025 विक्रमDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma’s Cricket Milestones

भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मैदानापासून दूर आहे. आगामी एशिया कपमध्ये तो खेळताना दिसणार नाही, कारण या वेळी एशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये होणार आहे, ज्यातून रोहितने मागील वर्षीच निवृत्ती घेतली आहे.

सध्या तो फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. मात्र, पुढील सामन्यात तो मैदानात उतरला की त्याचे नाव भारतीय क्रिकेटमधील एका विशेष क्लबमध्ये नोंदवले जाईल. या क्लबमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय खेळाडू आहेत आणि रोहित शर्मा पाचवा खेळाडू होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

सर्वाधिक सामने

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक सामने खेळण्याचा मान सचिन तेंडुलकर यांना आहे. 1989 मध्ये पदार्पण केलेल्या तेंडुलकरने 2013 पर्यंत तब्बल 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यानंतर या यादीत विराट कोहली 550 सामन्यांसह दुसऱ्या, एम.एस. धोनी 535 सामन्यांसह तिसऱ्या, तर राहुल द्रविड़ 504 सामन्यांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

Rohit Sharma celebrating IPL 2025 record | हिटमॅन रोहित IPL 2025 विक्रम
Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

रोहितचा 500 सामन्यांचा टप्पा

रोहित शर्माने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि आतापर्यंत तो 499 सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला 500 सामन्यांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एका सामन्याची गरज आहे.

Rohit Sharma celebrating IPL 2025 record | हिटमॅन रोहित IPL 2025 विक्रम
Asia Cup 2025: आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध 'सूर्या'ची बॅट 'खामोश', आकडेवारी पाहून चाहते चिंतेत; माजी खेळाडूने उपस्थित केले सवाल!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक क्षण

भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, तिथे तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरला तर तो भारतासाठी 500 सामने खेळणारा पाचवा खेळाडू बनेल. हा क्षण त्याच्या कारकिर्दीत ऐतिहासिक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com