योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यांना हिंदी भाषा येत नाही त्यांना परदेशी समजले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. संजय निषाद म्हणाले की, ''आम्ही सर्व प्रादेशिक भाषांचा आदर करतो, मात्र कायद्यानुसार हिंदी ही भारताची राजभाषा आहे. त्यामुळे जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. तो कितीही मोठा राजकारणी असो.''
दरम्यान, संजय निषाद हे योगी मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. ते राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या आम दलाचे अध्यक्ष आहेत. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि कन्नड अभिनेता किचा सुदीप यांच्यात हिंदीवरुन वाद झाला होता. त्यानंतर ते म्हणाले की, 'ज्यांना भारतात रहायचे आहे, त्यांना हिंदी भाषा आलीच पाहिजे. जर कोणाला हिंदी आवडत नसेल तर त्याला परदेशी मानले जाईल. आम्ही प्रादेशिक भाषांचा आदर करतो. देशाला एक संविधान आहे.' ते पुढे म्हणाले की, ''जे हिंदी बोलत नाहीत त्यांच्यासाठी भारत हे ठिकाण नाही. त्यामुळं त्यांनी देश सोडून दुसरीकडे जावं.''
काही लोक देशात तणावाचे वातावरण निर्माण करत आहेत
संजय निषाद म्हणाले की, 'काही लोक हिंदीला विरोध करुन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.' ते पुढे म्हणाले की, 'संविधान कोणत्याही भाषेला 'राष्ट्रीय भाषे' चा दर्जा देत नाही. राज्यघटनेत 22 'अधिकृत भाषा' आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत.'
भाजप प्रवक्त्याने निषाद यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले
भाजप प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, 'हिंदी ही राष्ट्रभाषा असून ती देशाला एका सूत्रात बांधते. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि राम मनोहर लोहिया यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याबद्दल म्हटले होते.' दुसरीकडे, त्रिपाठी निषाद यांच्या वक्तव्याशी सहमत नाहीत. ज्यांना हिंदी येत नाही त्यांनी देश सोडून जावे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारत हा बहुभाषिक देश असून सर्व भाषांचा आदर केला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.