Double Murder Case Dainik Gomantak
देश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Brother Shoots Two Sisters In Roorkee: उत्तराखंडमधील रुडकी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Roorkee Double Murder Case: उत्तराखंडमधील रुडकी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. गंगनहर कोतवाली हद्दीत मंगळवारी उशिरा संध्याकाळी एका माथेफिरु तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या अंधाधुंद गोळीबारात त्याचा मेहुणादेखील गंभीर जखमी झाला असून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन्ही घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याने पूर्व नियोजित कटाप्रमाणे हा गोळीबार केला. आरोपीने सर्वात आधी गणेशपुर भागात राहणारी आपली बहीण शकुंतला हिच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लगेचच आरोपीने आझाद नगर पनियाला रोड येथील संतोषी माता मंदिरासमोरील गल्ली नंबर 5 गाठली आणि तिथे राहणारी दुसरी बहीण पुष्पा व मेहुण्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत पुष्पाचाही जागीच मृत्यू झाला, तर तिचा नवरा गंभीर जखमी झाला.

गोळीबाराचा थरार घडवल्यानंतर आरोपी विक्की घटनास्थळावरुन फरार होण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले आणि जखमी मेहुण्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींची हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुडकी शहरात हल्लकल्लोळ उडाला. सध्या पोलिसांनी दोन्ही घटनास्थळे सील करुन महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली असून आरोपीच्या शोधात संभाव्य ठिकाणांवर छापे मारले जात आहेत. तसेच परिसरातील मुख्य रस्ते आणि घटनास्थळांच्या आसपासचे सीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरुन आरोपीचा पळून जाण्याचा मार्ग स्पष्ट होऊ शकेल. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी अद्याप हत्येच्या मुख्य कारणाचा अधिकृत खुलासा केलेला नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करून या घटनेमागील सत्य समोर आणण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

SCROLL FOR NEXT