Rohit Sharma Angry Video Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Angry Video: चालत्या कारमध्ये रोहित शर्मासोबत गैरवर्तन; चाहत्याला 'हिटमॅन'ने झापलं, पाहा व्हिडिओ

Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या मैदानातील आक्रमक खेळीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो मैदानाबाहेर आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखला जातो.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या मैदानातील आक्रमक खेळीसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो मैदानाबाहेर आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, नुकताच रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांवर प्रचंड संतापलेला दिसत आहे. काही चाहत्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे रोहितला आपला राग अनावर झाला आणि त्याने त्यांना कडक शब्दांत तंबी दिली.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रोहित शर्मा आपल्या कारमधून जात असताना काही लहान चाहते त्याच्या कारजवळ आले. रोहितने नेहमीप्रमाणे मोठे मन दाखवत चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी कारची काच खाली केली आणि हात बाहेर काढला.

मात्र, याच वेळी चाहत्यांनी अतिउत्साहात रोहितचा हात धरून त्याला कारबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला आणि सेल्फीसाठी धक्काबुक्की सुरू केली. कार चालत असताना अशा प्रकारे ओढाताण करणे केवळ रोहितसाठीच नाही तर त्या चाहत्यांच्या जिवासाठीही धोकादायक ठरू शकले असते.

संतापलेल्या रोहितने झाडली काच

चाहत्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे रोहितला राग आला. त्याने तातडीने आपला हात आत घेतला आणि सुरक्षेच्या कारणास्तव कारची काच बंद करून तिथून निघून गेला. रोहितच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे सांगत होते की, त्याला चाहत्यांची ही 'बदतमीजी' अजिबात आवडलेली नाही. चाहत्यांच्या प्रेमाचा आदर करणारा 'हिटमॅन' यावेळी मात्र त्यांना शिस्त आणि सुरक्षेचा धडा देताना दिसला.

विजय हजारे ट्रॉफीत धमाका

मैदानावरील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने दीर्घकाळानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला. २८ डिसेंबर रोजी सिक्कीमविरुद्ध खेळताना त्याने १५५ धावांची वादळी खेळी करून आपण फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध केले.

मात्र, उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. आता रोहित शर्मा ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेतून पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे होणार असून राजकोट आणि इंदूरमध्ये पुढील सामने खेळवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: अडकलेली कामे मार्गी लागणार! 'या' 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राहू ग्रहाची 'युवावस्था' पालटणार नशीब

Shikhar Dhawan: बांगलादेशातील हिंदू महिलेवरील अत्याचारावर संतापला 'गब्बर'; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, "अशी हिंसा सहन केली जाणार नाही!"

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT