Rohit Sharma, Virat Kohli Dainik Gomantak
देश

Rohit Sharma - Virat Kohli Retirement: रोहित - विराट निवृत्ती घेणार? क्रिकेटला निरोप देण्यासाठी उलटी गिनती सुरू

Rohit-Virat Retirement: भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची असणार आहे.

Sameer Amunekar

Rohit Sharma And Virat Kohli Retirement

भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्या निवृत्तीबद्दल सतत चर्चा सुरू आहे. जर टीम इंडियाला १२ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल, तर या दोन्ही खेळाडूंनी धावा करणे महत्त्वाचं आहे.

आता या दोन दिग्गज खेळाडूंबद्दल असं म्हटले जात आहे की, पाकिस्तानमध्ये होणारी ही स्पर्धा ५० षटकांच्या फॉरमॅटमधील त्यांची शेवटची स्पर्धा असू शकते. सोशल मीडियावर याबद्दल बरेच काही बोलले जात आहे.

टी-२० नंतर आता दोघांचीही एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याची वेळ जवळ आली आहे. याचं कारण म्हणजे २०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर दोन्ही खेळाडूंनी जास्त एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत.

विराट-रोहित शेवटचा एकदिवसीय कधी खेळले?

गेल्या वर्षी विराट-रोहितनं श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती, जिथं भारतीय कर्णधार रोहितनं मालिकेत सर्वाधिक १५७ धावा केल्या होत्या. विराटबद्दल बोलायचे झाले तर, मालिकेत त्याच्या बॅटमधून फक्त ५८ धावा आल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, भारताला २०२७ मध्ये सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा खेळायची आहे. आफ्रिकेच्या भूमीवर ही स्पर्धा सुरू होण्यास बराच वेळ आहे आणि तोपर्यंत रोहित ४० वर्षांचा असेल, तर विराट कोहली ३९ वर्षांचा असेल. हे पाहता निवडकर्ते निश्चितच या दोघांच्या जागी नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार करू शकतात.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामान्य कामगिरीनंतर, रोहित शर्मा आणि कोहली एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसले. रोहितने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली रणजीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध सामना खेळला.

मात्र, दोन्ही डावात त्यांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. कोहलीने रेल्वेविरुद्ध सामना खेळून रणजीमध्ये पुनरागमन केले. रोहितप्रमाणे, विराटचे पुनरागमन देखील विशेष नव्हते कारण तो फक्त सहा धावांवर बाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT