Goa Beef Export: गोवा इराकसह मध्य पूर्व देशांना 'गोमांस' निर्यात का करतंय?

Why Goa Exporting Beef to Middle East: मीट कॉम्पलेक्स आणि कर्नाटकच्या सनफेस अ‍ॅग्रोफूड प्रा. लि. यांनी यासाठी भागीदारी केली आहे.
Goa Beef Export: गोवा इराकसह मध्य पूर्व देशांना 'गोमांस' निर्यात का करतंय?
Why Goa Exporting Beef to Middle EastDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिसेंबर २०२४ मध्ये गोमांस आणि चिकनचा तुटवडा निर्माण झालेल्या गोव्यातून आता मध्यपूर्व देशांना गोमांस निर्यात केली जात आहे. नुकेतच राज्यातून इराकला २८.५ टन गोमांस जहाजाद्वारे निर्यात करण्यात आले. गोव्यात कत्तलीसाठी गुरांची कमतरता असताना शेजारच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातून जनावरं आयात करुन गोमांस निर्यात केली जात आहे.

गोवा मीट कॉम्पलेक्समधून गोमांस निर्यात केली जात आहे. या निर्यातीसह गोव्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पदार्पण केले आहे. मीट कॉम्पलेक्समधून गुरुवारी (२९ जानेवारी) इराकला २८. ५ टन निर्यात करण्यात आले. उसगाव येथील गोवा सरकारच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मीट कॉम्पलेक्स आणि कर्नाटकच्या सनफेस अ‍ॅग्रोफूड प्रा. लि. यांनी यासाठी भागीदारी केली आहे.

Goa Beef Export: गोवा इराकसह मध्य पूर्व देशांना 'गोमांस' निर्यात का करतंय?
Goa CM In New Delhi: महाराष्ट्रानंतर दिल्ली गाजवतायेत गोव्याचे मुख्यमंत्री; रॅली, प्रचार सभांचा धडाका

गोव्यातून मध्य पूर्व भागातील सात ते आठ देशांसोबत गोमांस निर्यातीसाठी मीट कॉम्पलेक्सने करार केल्याची माहिती आहे. दर महिन्याला राज्यातून २० कंटेनर निर्यात करण्याची क्षमता आहे. यासाठी कर्नाटकातील सनफेस अ‍ॅग्रोफूड सोबत करार करण्यात आला आहे, अशी माहिती मीट कॉम्पलेक्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश केणी यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिली आहे.

उसगाव येथे असणाऱ्या कत्तलखान्यात दररोज ३०० जनावरांची कत्तल करण्याची क्षमता आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मांस फ्रीज करण्याची देखील सुविधा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या सुविधेचा फायदा होतो. खत्तलखान्यात निर्माण होणारे मांत्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानंकनानुसार तयार केले जात असल्याचा दावा केणी यांनी केला आहे.

Goa Beef Export: गोवा इराकसह मध्य पूर्व देशांना 'गोमांस' निर्यात का करतंय?
KP Chowdary Death: प्रसिद्ध तेलगु चित्रपट निर्मात्याने गोव्यात संपवले जीवन, ड्रग्ज प्रकरणात झाली होती अटक

गोव्यात कत्तलीसाठी जनावरांची संख्या कमी आहे. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी मीट कॉम्पलेक्स शेजारच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातून जनावरं आयात करण्याची योजना आहे. मीट कॉम्पलेक्समधून बाहरीन, कुवेत, संयुक्त अरब आमिरात, इराक यासारख्या देशातून गोमांसाची मागणी केली जात असल्याची माहिती केणी यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

२०२४ डिसेंबर महिन्यात गोव्यात गोमांस आणि चिकनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. राज्य सरकारला देखील यात लक्ष घालून तोडगा काढावा लागला. ख्रिसमस काळात देखील राज्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण होता. दरम्यान, याकाळात चढ्या दराने मटण विक्री केली जात होती. दरम्यान, गोव्यातून आता आंतरराष्ट्रीय बाजारात गोमांस निर्यात केले जात आहे.

Goa Beef Export: गोवा इराकसह मध्य पूर्व देशांना 'गोमांस' निर्यात का करतंय?
Goa Police: सुलेमान खान फरार प्रकरणानंतर पोलिसांनी घेतला धडा; कैद्यांना पलायन करता येऊ नये यासाठी करणार सक्त SOP

या निर्यातीवरुन आता गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली जात आहे. आंतरराष्ट्रीय निर्यात सुरु असल्याने राज्यात गोमांस तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. निर्यात मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यात कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याचे देखील काही जणांनी म्हटले आहे. काही हिंदू गटांनी देखील गोवा सरकारवर या निर्यातीवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com