बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेवर सर्वपक्षीय एकमत झाले आहे. मात्र, त्यावरुन राजकारण सुरुच आहे. या मुद्द्यावरुन राजदचे प्रमुख नेते आजही भाजपवर निशाणा साधत आहेत. RJD नेते तेजस्वी यादव यांचा दावा आहे की, 'आम्ही केलेल्या आंदोलनामुळे भाजपला या मुद्द्यावर सहमती दर्शववावी लागली.' यासंदर्भात त्यांनी एकामागून एक अनेक ट्विट केले.(RJD leader Tejaswi Yadav has criticized the BJP over the issue of the caste-wise census in Bihar)
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "बिहारमध्ये (Bihar) जातीवर आधारित जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रदीर्घ लढ्यानंतर सार्वजनिक दबाव आणि वैचारिक पक्षांच्या बाजूने लढा दिल्यानंतर लवकरच विहित मुदतीत सर्व धर्माच्या जातींच्या आधारे जनगणना करण्यास मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
दुसरीकडे, सततच्या आंदोलनांमुळे भाजपला (BJP) या मुद्द्यावर आपली सहमती दर्शवावी लागली, असे तेजस्वी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले की, आम्ही त्यांना अल्टिमेटम देऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. अखेर भाजपला या मुद्यावर आपली सहमती दर्शवावी लागली. परंतु भाजप इतर राज्यांमध्ये आणि देशात जाती आधारित जनगणनेच्या विरोधात आहे. अचंबा करणारे आहे ना! 'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए'
तेजस्वी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "2011 च्या सामाजिक, आर्थिक आणि जात-आधारित जनगणनेचा अहवाल भाजप सरकारने सार्वजनिक केलेला नाही. तेव्हापासून धरणे, निदर्शने आदींद्वारे आमचा संघर्ष अविरतपणे सुरु होता. विधानसभेने दोनदा ठराव मंजूर केला. शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. आम्ही सर्व पक्षांना पत्रे लिहिली. तरीही भाजपने नकार दिला.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.