RCB player controversial celebration video Dainik Gomantak
देश

शतक झळकावल्यानंतर RCB च्या खेळाडूचं अश्लील कृत्य, वादग्रस्त सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल Watch Video

Vijay Hazare Trophy : क्रिकेट खेळात कधीकधी खेळाडूंच्या वर्तनामुळे या खेळाला गालबोट लागते. सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे.

Sameer Amunekar

क्रिकेट खेळात कधीकधी खेळाडूंच्या वर्तनामुळे या खेळाला गालबोट लागते. सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ (Vijay Hazare Trophy) ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत त्रिपुराकडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगने (Swapnil Singh) कर्नाटकविरुद्ध शानदार शतक झळकावले. मात्र, शतकाच्या आनंदात त्याने मैदानावर जे काही केले, ते पाहून क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्वप्नीलने शतक पूर्ण केल्यावर चक्क अश्लील हावभाव केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पहिल्या शतकाचा आनंद

कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात स्वप्नील सिंगने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. त्याने ९२ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही ऐतिहासिक खेळी साकारली. मात्र, शतक पूर्ण होताच त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने किंवा कोणा एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून बॅटच्या सहाय्याने अत्यंत अश्लील इशारा केला. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, स्वप्नीलचे सहकारी त्याच्या शतकाचे टाळ्या वाजवून स्वागत करत आहेत, पण त्याचे हे कृत्य पाहून काही खेळाडू हसतानाही दिसत आहेत. त्याने हा इशारा नेमका कोणाला आणि का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आरसीबी आणि स्वप्नील सिंग कनेक्शन

स्वप्नील सिंग हा आयपीएलमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) संघाचा भाग आहे. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी आरसीबीने त्याला संघात कायम ठेवले (Retain) होते. आता स्वप्नीलच्या या वादग्रस्त वर्तनामुळे नेटकऱ्यांनी थेट आरसीबीला लक्ष्य केले आहे. सोशल मीडियावर चाहते संताप व्यक्त करत असून, "अशा खेळाडूंमुळे संघाची प्रतिमा मलीन होते," अशा कमेंट्स करत आहेत. आरसीबीच्या चाहत्यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार

बीसीसीआय (BCCI) खेळाडूंच्या मैदानातील वर्तनाबाबत अत्यंत कडक नियम पाळते. यापूर्वी अनेक खेळाडूंना अशा प्रकारच्या गैरवर्तनाबद्दल दंड किंवा बंदीची शिक्षा भोगावी लागली आहे. स्वप्नील सिंगने केलेले हे कृत्य 'आचारसंहितेचे' उल्लंघन मानले जाऊ शकते. जर पंचांनी किंवा मॅच रेफरींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, तर स्वप्नीलच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. लिस्ट-ए क्रिकेटमधील आपल्या पहिल्या शतकाचा आनंद त्याने आपल्या चुकीच्या वागण्याने गमावला असल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT