Goa Tamnar Project: गोवा तम्नार प्रकल्पाला ‘कर्नाटक’ची मंजुरी! वीजवाहिनीसाठी 13 हजार झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरणप्रेमींत चिंता

Goa Tamnar Project Tree Cutting: धारवाड ते शेल्डेदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ४०० केव्ही वीजवाहिनी प्रकल्पाला कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने अखेर मंजुरी दिली आहे.
Goa Tamnar project
Goa Tamnar projectDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: धारवाड ते शेल्डेदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ४०० केव्ही वीजवाहिनी प्रकल्पाला कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. गोवा-तम्नार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेडने सादर केलेल्या या प्रस्तावामुळे कर्नाटकातील जंगल परिसंस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पाला मंजुरी देण्यास कर्नाटकने विलंब केला होता. गोवा राज्याने म्हादई प्रकल्पाच्या विरोधातील भूमिका मागे घ्यावी, मगच कर्नाटककडून या प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असा प्रस्तावही दिला होता. पण आता कर्नाटकने मवाळ भूमिका घेत या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कारवार जिल्ह्याच्या वनक्षेत्रातील १३ हजार झाडे तोडण्यात येणार आहेत.

या प्रकल्पासाठी दांडेली वन्यजीव अभयारण्यातील कॅसलरॉक विभागातील ७९.१३ एकर जमीन वापरण्यात येणार आहे. या ठिकाणच्या राखीव वनक्षेत्रातील ३ हजार २४८ झाडांची तोड प्रस्तावित आहे. याशिवाय अभयारण्याबाहेरील जंगल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे.

वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाला कर्नाटक शासनाकडून विरोध करण्यात आला होता.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पर्यावरणीय नुकसान कमी करण्याच्या अटींसह योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मूळ प्रस्तावात सुमारे ७२ हजार झाडांची तोड अपेक्षित होती. ती संख्या कमी करून १३ हजारांपर्यंत आणण्यात आली आहे.

१३ हजारांपेक्षा कमी झाडे तोडून ही योजना राबविता येईल का? याबाबत विचार करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. संपूर्ण वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन आराखडा सादर करण्याचे निर्देश वनमंत्री खांड्रे यांनी दिले आहेत. या प्रकल्पासाठी हल्याळ वनविभागातील १६०.२३ एकर वन जमीन देखील वापरण्यात येणार आहे.

Goa Tamnar project
Tamnar Project: गोव्‍यासमोर कर्नाटकची नरमाईची भाषा! ‘तम्नार’बाबत फेरविचार करणार; राज्‍याने दाखवली ‘ताकद’

त्यामुळे एकूण १३ हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार असल्याचे वन खात्याच्या कागदपत्रांत नमूद केले आहे. पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव अभ्यासकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम घाटाच्या संवेदनशील जैवविविधतेवर या प्रकल्पाचा दीर्घकालीन परिणाम होईल, तसेच हत्ती, वाघ, बिबट्या यांसारख्या वन्यजीवांच्या अधिवासात व्यत्यय येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Goa Tamnar project
Goa Tamnar Project: 'अल्वारिस' यांच्या आरोपात तथ्य नाही! वाढत्या मागणीनुसार ‘तम्नार’ हवाच; ढवळीकर यांचे प्रतिपादन

प्रकल्प क्षेत्रातील पर्यावरणीय वास्तव

  दांडेली अभयारण्य हे पश्चिम घाटातील अत्यंत संवेदनशील जैवविविधता क्षेत्र

  हत्ती, वाघ, बिबट्या, दुर्मीळ पक्षी आणि वनस्पतींचा अधिवास

  उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे वन्यजीव मार्ग बाधित होण्याची शक्यता

  जंगल तुटवड्यामुळे मानवी-वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com