Ram Rahim Dainik Gomantak
देश

Ram Rahim: राम रहीमने पुन्हा धमाकेदार गाणे केले लाँच, 'प्रतिमा सुधारण्याचा करतोय प्रयत्न'

Ram Rahim New Song: बलात्कार आणि हत्येचा दोषी गुरमीत राम रहीमने 15 दिवसांत त्याचे दुसरे गाणे लाँच केले आहे.

दैनिक गोमन्तक

Ram Rahim New Song: बलात्कार आणि हत्येचा दोषी गुरमीत राम रहीमने 15 दिवसांत त्याचे दुसरे गाणे लाँच केले आहे. त्याच्या फॉलोअर्संनी हे नवीन गाणे प्रचंड प्रमाणात व्हायरल केले आहे. या गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. वास्तविक, राम रहीमने या गाण्याच्या माध्यमातून ड्रग्जविरोधात मोहीम सुरु केली आहे.

दरम्यान, गाण्यातून लोकांना ड्रग्जच्या विरोधात संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सलग दोन गाणी रिलीज करुन राम रहीम पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. काही लोक राह रहीमचे कौतुक करत आहेत, तर काही लोक राम रहीम आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत आहेत.

राम रहीम 40 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे

सुनारिया तुरुंगातून 40 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर असलेल्या राम रहीमने यापूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर एक गाणे लाँच केले होते. दिवाळीला लाँच झालेल्या राम रहीमच्या गाण्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. राम रहीम बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

12 तासांत 12 लाखांहून अधिक व्ह्यूज

राम रहीमने त्याच्या 'जागो देश दे लोको, जागो दुनिया दे लोको' या नव्या गाण्याद्वारे ड्रग्ज सोडून देण्याचे, ड्रग्ज विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आणि कंत्राटे बंद करण्याचे आवाहन केले आहे. 12 तासांत 12 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. राम रहीमने दिवाळीला एक गाणेही लाँच केले होते. 'नित्त मनांदे दिवाली' हे गाणे सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाले होते. या गाण्याला आतापर्यंत एक कोटी 13 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

राम रहीम बागपतमध्ये राहतो

सध्या राम रहीम उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत येथील डेरामध्ये राहत आहे. राम रहीम आणि त्याच्या अनुयायांनी 8 नोव्हेंबरला डेराचे संस्थापक शाह मस्ताना जी महाराज यांच्या अवतार दिनानिमित्त बागपतमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात लोक ऑनलाइनही जोडले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT