Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण

2024 च्या जानेवारीपासून भक्तांना दर्शनासाठी खुले करणार मंदिर
Ram Mandir
Ram MandirDainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir: प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील श्री रामाच्या भव्य मंदिराचे 50 टक्के काम पुर्ण झाले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या एका सदस्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, 2024 च्या जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार आहे.

Ram Mandir
Kashmir मधून होणार हुर्रियतचा सफाया? या फुटीरतावादी नेत्याची राजकारणात एन्ट्री

तेव्हा मंदिरात प्रभू राम आणि इतर देवतांच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापणा देखील केली गेलेली असेल. सध्या ज्या वेगाने मंदिराचे काम सुरू आहे ते पाहता पुढील वर्षीच्या म्हणजेच 2023 च्या डिसेंबरपर्यंत मंदिराच्या ग्राऊंड फ्लोअरचे काम पुर्ण होईल. त्यामुळे जानेवारी 2024 पासून मंदिर खुले केले जाऊ शकते.

मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रूपये खर्च येणार आहे. प्रत्येक हिंदू देवतेला या मंदिरात योग्य स्थान दिले जाणार आहे. सध्याच्या योजनेनुसार मंदिरात सीता, वाल्मिकी, शबरी, जटायू, गणेश, लक्ष्मण यांचीही मंदिरे उभारली जाणार आहेत. त्यासाठी मंदिराच्या परिसरात 70 एकर जागाही निवडली गेली आहे.

Ram Mandir
700 Shops Burnt In Arunachal: तब्बल 700 दुकाने आगीत जळून खाक; फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय

मंदिरात दोन मजल्यांवर परिक्रमेसाठी एक रस्ताही बनवला जात आहे. मंदिराच्या समोरील भागात सँडस्टोनने बनलेले एक द्वार असेल. अगदी रात्रीही काम केलेज जात आहे. स्वतः पंतप्रधान मोदी देखील वरचेवर या कामाचा आढावा घेत असतात. नुकतेच दिवाळीच्या पुर्वसंध्येला ते अयोध्येत आले होते तेव्हा त्यांनी राम मंदिराच्या कामाची पाहणी केली होती. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे मंदिराचे काम रखडले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी हे मंदीर पुर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. भाजपला जनमानसात निवडणुकीपुर्वी योग्य संदेश देण्याची इच्छा आहे. त्यातून यासाठी प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीपुर्वी मंदिर झाल्यास हिंदुंमध्ये एकजूट होऊन, त्याचा फायदा पक्षाला होईल, असे भाजपला वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com