Gurmeet Ram Rahim: राम रहीमच्या दरबारात 'AAP' मंत्र्यांची हजेरी, डेराने केला सन्मान

Fauja Singh Sarari: गुरमीत राम रहीम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येताच डेरामध्ये नेत्यांची चलती सुरु झाली आहे.
Fauja Singh Sarari
Fauja Singh Sarari Dainik Gomantak
Published on
Updated on

Fauja Singh Sarari In Dera: खून आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येताच डेरामध्ये नेत्यांची चलती सुरु झाली आहे. अलीकडेच पंजाब सरकारचे मंत्री फौजा सिंग सरारी यांचे गुरु हर सराय शहरातील डेरा सच्चा सौदाच्या 'नाम चर्चा घर' या कार्यक्रमात सहभागी झाले होते, ज्यावरुन वाद सुरु झाला आहे.

डेराने फौजा सिंग सरींचा सन्मान केला

फौजा सिंग सररी यांनी गेल्या शनिवारी 'नाम चर्चा घर' या कार्यक्रमात भाग घेतला, जिथे डेरामधील राम रहिमच्या भक्तांनी त्यांचा सन्मान केला. मात्र, डेरा सच्चा सौदाचे म्हणणे आहे की, 'फौजा सिंग सरारी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, ते तेथून जात होते. यादरम्यान स्थानिक लोकांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगण्यासाठी थांबवून शिबिरात आणले. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते.'

Fauja Singh Sarari
राहुल गांधींना 'Bharat Jodo Yatra' मध्ये अभिनेत्री पूजा भटने दिली साथ

फौजा सिंग सरारी विरोधकांच्या निशाण्यावर आले

आरोपी (Accused) गुरमीत राम रहीमच्या डेऱ्यात हजेरी लावल्यानंतर पंजाबचे कॅबिनेट मंत्री फौजा सिंग सररी यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले की, 'पंजाब (Punjab) सरकार बारगढी हत्याकांडातील दोषीच्या पाया पडले, मग न्यायाची आशा कशी ठेवता येईल.'

फौजा सिंग सरारी यांनी स्पष्ट केले

त्याचवेळी, फौजा सिंग सररी (Fauja Singh Sarari) यांनी स्पष्टीकरण देत ही घटना चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला आहे. डेरा सच्चा सौदाच्या कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

Fauja Singh Sarari
Punjab Government ने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, जुनी पेन्शन योजना केली बहाल

शिष्यांवर बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

आपल्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग (Gurmeet Ram Rahim Singh) अलीकडेच 40 दिवसांच्या पॅरोलवर सुनारिया तुरुंगातून बाहेर आला, त्यानंतर तो बरनावा आश्रमात गेला.

Fauja Singh Sarari
Punjab News: 'मद्यधुंद' असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून उतरवले?

दुसरीकडे, तुरुंगातून बाहेर आल्यापासून राम रहीम बागपत येथील डेराच्या बरनावा आश्रमातून फक्त ऑनलाइन सत्संग करत आहे. डेरा मॅनेजर रणजित सिंग याच्यासह चौघांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरुन राम रहीमलाही गेल्या वर्षी दोषी ठरवण्यात आले होते. डेरा प्रमुख आणि इतर तिघांना 2019 मध्ये 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com