Crime News Dainik Gomantak
देश

Crime News: रक्षकच बनला भक्षक! हेड कॉन्स्टेबलकडून हिंदू महिलेवर दीड वर्ष अत्याचार, मुलीसमोर विवस्त्र व्हायचा, धर्मांतरासाठीही दबाव

Rajkot Police Head Constable Arrested: गुजरातच्या राजकोटमधील युनिव्हर्सिटी पोलिसांनी एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला अटक केली आहे.

Sameer Amunekar

गुजरातच्या राजकोटमधील युनिव्हर्सिटी पोलिसांनी एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला अटक केली आहे. ट्रॅफिक ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यावर एका ३१ वर्षीय विवाहित हिंदू शेजारील महिलेवर गेल्या दीड वर्षांपासून बलात्कार करणे, तिला ब्लॅकमेल करणे, धमकावणे आणि तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप आहे.

पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिच्या पाच वर्षांच्या निष्पाप मुलीसमोरच विवस्त्र होत असे आणि अत्यंत अश्लील व विकृत चाळे करायचा. आरोपीच्या या भयंकर वर्तनामुळे ती लहान मुलगी इतकी मानसिक धक्क्यामध्ये गेली आहे की, ती आता स्वतःच्या आईजवळ जाण्यासही घाबरत आहे.

टेलरच्या दुकानातील ओळख आणि धमकावून अत्याचार

पीडित महिलेचे लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होते. जानेवारी २०२५ मध्ये ती काही कारणास्तव आपल्या मुलीसह आईच्या घरी राहण्यासाठी आली होती. तिथे कपडे शिवण्याच्या एका टेलरच्या दुकानात तिची ओळख इमरान हबीबभाई राऊमा या पोलीस कर्मचाऱ्याशी झाली, जो सध्या हेड कॉन्स्टेबल आहे.

एका रात्री १२ च्या सुमारास इमरानने जबरदस्तीने पीडितेच्या घराचे दार उघडून आत प्रवेश केला. त्याने पीडितेने मारहाण केली, तिचे कपडे उतरवून तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि याबद्दल कोणालाही सांगितल्यास फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलिसांच्या वर्दीतच कृत्य आणि अमानुष छळ

या धमकीनंतर इमरानचा छळ अधिकच वाढत गेला. त्याने अनेकदा पोलिसांची वर्दी घालूनच पीडितेवर अत्याचार केले. या त्रासाला कंटाळून पीडिता आपल्या सासरी परतली, तरीही इमरानने तिचा पिच्छा सोडला नाही. त्याने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले आणि तिच्यावर स्वतःचा धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी (धर्मांतर) सतत मानसिक दबाव आणला.

इतकेच नव्हे तर, जेव्हा इमरानची शासकीय बंदोबस्तासाठी सासन (गीर) येथे बदली झाली, तेव्हाही त्याने पीडितेला जबरदस्तीने तिथे बोलावून घेतले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. या काळात त्याने तिच्या पाच वर्षांच्या लहान मुलीसोबतही अश्लील चाळे आणि लैंगिक छळ केला. अखेर इमरानच्या अमानुष छळाला कंटाळून आणि स्वतःच्या मुलीची दयनीय अवस्था पाहून महिलेने हिंमत एकवटली आणि युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम इमरान राऊमा याला बेड्या ठोकल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT