Rohit-Virat Retirement Dainik Gomantak
देश

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

Rohit Sharma And Virat Retirement: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटला निरोप दिला आहे. आता हे दोन्ही खेळाडू लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे.

Sameer Amunekar

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय क्रिकेट भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. अलिकडच्या काळात, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतात अशी जोरदार चर्चा होती. परंतु राजीव शुक्ला यांनी या सर्व अटकळांना फेटाळून लावत म्हटले आहे की कोहली आणि रोहित अजूनही भारतीय एकदिवसीय संघाचा भाग आहेत.

यूपी टी२० लीग दरम्यान एका मुलाखतीत, जेव्हा त्यांना कोहली आणि रोहितच्या संभाव्य निवृत्तीबद्दल विचारण्यात आले तेव्हा शुक्ला स्पष्टपणे म्हणाले, "ते निवृत्त कधी झाले? रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या एकदिवसीय सामने खेळत आहेत.

जर ते खेळत असतील तर आता निरोपाबद्दल का बोलायचे? काळजी करण्याची गरज नाही. आमचे धोरण स्पष्ट आहे, बीसीसीआय कधीही कोणत्याही खेळाडूला निवृत्त होण्यास सांगत नाही. हा निर्णय खेळाडूने स्वतः घ्यावा."

राजीव शुक्ला पुढे म्हणाले की, दोन्ही वरिष्ठ खेळाडू उत्तम फॉर्म आणि तंदुरुस्तीमध्ये आहेत आणि एकदिवसीय क्रिकेट खेळत राहतील. ते म्हणाले की, तुम्ही लोक आधीच निरोप घेण्याबद्दल बोलू लागले आहात. विराट कोहली पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्याचा खेळ सुरू आहे. रोहित शर्मा शानदार फलंदाजी करत आहे. वेळ आल्यावर आपण पाहू, पण सध्या हे निश्चित आहे की दोघेही खेळतील.

कोहली आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतली आहे. आता ते १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. रोहित शर्मा माजी भारतीय सहाय्यक प्रशिक्षक आणि त्याचा जवळचा मित्र अभिषेक नायर यांच्यासोबत सराव करताना दिसला, तर विराट कोहली लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर सराव करताना दिसला.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या वर्षी जूनमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वी २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली होती. आता दोन्ही अनुभवी खेळाडूंचे संपूर्ण लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT