Rajdhani Express Accident Assam X- Post
देश

Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

Rajdhani Express Accident Assam: हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना सीलचार – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस त्यांना धडकली.

गोमंतक ऑनलाईन टीम

आसाम: आसाममध्ये हत्तीच्या कळपाला धडकून ट्रेनचा अपघात झाला आहे. हत्तीच्या कळपाला राजधानी एक्सप्रेस धडकली आणि ट्रेन रुळावरुन खाली घसरली. यात आठ हत्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (१९ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास होजाई जिल्ह्यात ही घटना घडली.

होजाई जिल्ह्यात हत्तींचा वावर अधिक प्रमाणात असतो. कामपूर येथून जाणाऱ्या रेल्वे मार्गात बऱ्याचवेळा हत्ती वावरत असतात. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रुळावर हत्तींचा कळप आल्याने भरधाव राजधानी त्यांना धडकून रुळावरुन खाली घसरली.

हत्तींचा कळप रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना सीलचार – नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस त्यांना धडकली.

या अपघातात रेल्वे कर्मचारी किंवा प्रवासी जखमी झालेले नाहीत. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. या अपघातामुळे जंगली प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपत्कालिन पथकाने घटनास्थळी दाखल होत मृत हत्तीना रुळावरुन हटविण्यास सुरुवात केली. यात एक लहान हत्तीही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

या अपघातामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत मागणी वन्यप्राणी प्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे. सुरक्षेसाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT