Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Foreign nationals in Goa: वैध व्हिसाशिवाय भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव केल्याप्रकरणी पेडणे येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने दोन परदेशी नागरिकांना दोषी ठरवले आहे.
Court Order | Goa Crime News
Margao Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वैध व्हिसाशिवाय भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव केल्याप्रकरणी पेडणे येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने दोन परदेशी नागरिकांना दोषी ठरवले आहे. ही शिक्षा न्यायमूर्ती शबनम नागवेकर यांनी दिली.

रशियन नागरिक सर्गेई झायटसेव्ह (वय ४७) आणि बेलारूस देशाच्या नागरिक याउहेनी कोझेल (वय ३६) तुये येथील मुरमुशे गावात गीतांजली आमोणकर यांच्या भाड्याच्या घरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती न्यायालयात पोलिसांनी दिली.

Court Order | Goa Crime News
Foreign Tourists Goa: गोव्यातील व्हिसा संपलेल्या विदेशींना शोधणे आव्हान! 234 हद्दपार; गैरप्रकारांच्या वाढल्या तक्रारी

न्यायालयाने शिक्षेवरील आदेश राखून ठेवला असून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षा जाहीर करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही दोषी आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. २५ जून २०२५ रोजी पेडणे पोलिसांच्या हद्दीत नियमित गस्तीदरम्यान पोलिसांनी सदर घरात वास्तव्यास असलेल्या दोन परदेशी नागरिकांची कागदपत्रे तपासली.

Court Order | Goa Crime News
Goa Foreigners: 24 विदेशी नागरिकांचा भुर्दंड गोवा सरकारवर! बेकायदेशीर वास्तव्यामुळे स्थानबद्ध; काहीजणांवर खटले सुरू

तपासात असे आढळून आले की, दोघांचे पासपोर्ट वैध असले तरी त्यांची भारतीय व्हिसा मुदत संपलेली होती. तपासानुसार, सर्गेई झायटसेव्ह यांचा व्हिसा २१ जानेवारी २०२४ रोजी आणि याउहेनी कोझेल यांचा व्हिसा ५ सप्टेंबर २०२४ रोजी संपल्याचे सिद्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com