रामनगर: हुल्लडबाजांमुळे दर्दी पर्यटक व ट्रेकर्सना जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. वीकेंड साजरा करण्यासाठी आलेल्या काही मद्यधुंद पर्यटकांनी रेल्वे पोलिसांना धक्काबुक्की केल्यामुळे रेल्वे (Railway) खात्याने सोमवारपासून धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. पायी अथवा रेल्वेतूनही धबधब्याजवळ जाता येणार नाही. (The Indian Railways has banned tourists from visiting the Dudhsagar waterfall)
कर्नाटकच्या हद्दीवर व गोव्यातील भगवान महावीर अभयारण्यात असलेला दूधसागर देशातील पाचव्या क्रमाकांचा धबधबा आहे. हा धबधबा सुमारे 310 मीटर (1,030 फूट) उंचीवरून कोसळतो. त्याची सरासरी रुंदी 30 मीटर आहे. मुसळधार पावसात या धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलते. धुक्याची दुलई पांघरलेला व शुभ्र तुषार उडविणारा हा धबधबा पाहणे स्वर्गीय सुखच असते. सभोवताली पसरलेल्या दाट जंगलामुळे धबधब्याच्या सौंदर्यात भर पडते. कर्नाटकातील कॅसलरॉक रेल्वे स्थानकापासून रस्त्याने व रेल्वेमार्गाने दूधसागरपर्यंत जाता येते. तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत पोचता येते. दूधसागरजवळ रेल्वे 1 ते 2 मिनिटे थांबते.
दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. मात्र, दोन वर्षांपूर्वीपासून रेल्वे खात्याने दूधसागर थांब्यावर उतरण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. रेल्वेतून येणाऱ्या पर्यटकांना कॅसलरॉकमधूनच परत पाठविले जात आहे. कुणालाही धबधब्यापर्यंत जाऊ दिले जात नसून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.