Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Joined Congress Riskiest Thing Viral Video: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यातील आव्हाने आणि साहसाबद्दल विचारले.

Manish Jadhav

Joined Congress Riskiest Thing Viral Video: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी समाजातील विविध घटकांशी संवाद साधत असतात. नुकताच त्यांचा दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनींसोबतचा एक मजेशीर आणि रंजक व्हिडिओ समोर आला. या संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने दिलेल्या उत्तराने केवळ उपस्थित असलेले सर्वच नाही, तर खुद्द राहुल गांधीही हसून हसून लोटपोट झाले. राजकारणातील जोखीम आणि तरुणाईचे विचार यावर आधारित या संवादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यातील आव्हाने आणि साहसाबद्दल विचारले. गप्पांच्या ओघात राहुल यांनी एका विद्यार्थिनीला प्रश्न केला की, "तू तुझ्या आयुष्यात केलेली सर्वात जोखमीची गोष्ट कोणती?" यावर त्या विद्यार्थिनीने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, "काँग्रेसमध्ये प्रवेश करणे!" हे उत्तर ऐकताच हास्याचे कारंजे उडाले. विद्यार्थिनीच्या या हजरजबाबीपणामुळे राहुल गांधीही थक्क झाले. त्यांनी मनमोकळेपणाने हसत दाद दिली आणि म्हणाले, "ओके, ही नक्कीच मोठी जोखीम आहे!"

हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून याला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे. या संवादामध्ये राहुल गांधी केवळ राजकीय नेते म्हणून नाही, तर एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत विद्यार्थिनींशी संवाद साधताना दिसले. विद्यार्थिनीच्या त्या उत्तराने देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर आणि काँग्रेस पक्षाच्या स्थितीवर एक मिश्किल भाष्य केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांनी हे उत्तर अत्यंत सकारात्मक पद्धतीने स्वीकारले, ज्यामुळे त्यांच्या खिलाडूवृत्तीचेही कौतुक होत आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, आजची तरुणाई राजकारणाकडे केवळ एक करिअर म्हणून नाही, तर एका मोठ्या आव्हानाकडे म्हणून पाहत आहे. विद्यार्थिनीचे ते उत्तर सध्याच्या राजकीय संघर्षाला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना कराव्या लागणाऱ्या मेहनतीला अधोरेखित करणारे ठरले. या संवादादरम्यान विद्यार्थिनींनी त्यांच्या करिअरबद्दल, देशातील शिक्षणाबद्दल आणि महिलांच्या सुरक्षिततेबद्दलही राहुल गांधी यांच्याशी मोकळेपणाने चर्चा केली. मात्र, 'काँग्रेस प्रवेशाची जोखीम' हे उत्तर या संपूर्ण भेटीचे मुख्य आकर्षण ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT