Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: 'केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींचा तेलंगणात हल्लाबोल!

Telangana: केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन केले होते. केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

Manish Jadhav

Rahul Gandhi Addressed Rally In Telangana: दिल्लीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय समितीचा (BRS) पराभव करणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले.

हैदराबादमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बीआरएस, भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप केला.

केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन केले होते. केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल पुढे म्हणाले की, ते (केसीआर) सर्वात भ्रष्ट सरकार चालवतात.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्रीय एजन्सी केसीआर यांच्या मागे का नाहीत?

'देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे'

प्रियंका गांधी वड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या समवेत, राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 'ते पंतप्रधानांशी लढत असल्याने, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये 24 खटले नोंदवले गेले आहेत आणि न्यायालये त्यांना वेळोवेळी समन्स पाठवतात.' ते पुढे म्हणाले की, 'मला पहिल्यांदाच बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी घर हिरावून घेण्यात आले, मात्र देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे.'

मी आणि माझी बहीण, दिल्लीत तेलंगणा पहरेदार'

मी आणि माझी बहीण तेलंगणासाठी (Telangana) दिल्लीत पहरेदार आहोत, असेही ते म्हणाले. तुम्हाला काही हवे असेल तर मला आणि माझ्या बहिणीला आदेश द्या, आम्ही उपस्थित राहू. तेलंगणातील लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करु. कारण जेव्हा इंदिरा गांधीजींची गरज होती तेव्हा तेलंगणातील जनतेने त्यांना साथ दिली आणि मदत केली. हे आम्ही कधीच विसरु शकत नाही, असेही राहुल पुढे म्हणाले.

ओवेसींवर निशाणा साधला

दरम्यान, राहुल यांनी एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांच्यावरही टीकास्त्र डागले. त्यांच्याविरोधात किती खटले आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सी सातत्याने आपल्यामागे असतात असा दावा करत राहुल गांधी यांनी ओवेसी यांच्यामागे कोणती एजन्सी आहे का असा सवाल केला.

राहुल पुढे म्हणाले की, "ओवेसी यांच्यावर एकही खटला का नाही, असा प्रश्न पडतो, आणि उत्तर म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष मोदींना मदत करतात. काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एआयएमआयएम विविध राज्यात आपले उमेदवार उभे करत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी रचला इतिहास, बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान VIDEO

Kelbai Goddess: हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गाव जलाशयाखाली बुडाला, कदंबकालीन गुळ्ळेची 'केळबाय'

Viral Video: अजब-गजब कारनामा! 'या' पठ्ठ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ; पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Dak Adalat Goa: टपाल वस्तूंचे वितरण, मनीऑर्डर, बचत खात्याच्या समस्या सुटणार; पणजीत होणार 63 वी 'डाक अदालत', कसा अर्ज करायचा? वाचा

MRF Recruitment: नोकरभरती वादावर अखेर पडदा! 'एमआरएफ' कडून गोमंतकीय तरुणांना प्राधान्य; फर्मागुढीत मुलाखतींचं आयोजन

SCROLL FOR NEXT