Rahul Gandhi: भाजपचे खासदार हे मंदिरातील मूर्तीसारखे; त्यांच्या हाती कसलीही सत्ता नाही... राहुल गांधींची टीका

जातनिहाय जनगणनेवरून लक्ष हटविण्यासाठी महिला आरक्षण विधेयकाची युक्ती
Rahul Gandhi On Member Of Parlieaments
Rahul Gandhi On Member Of Parlieaments Dainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi on Member of Parliament: भाजपचे खासदार हे मंदिरातील मूर्तीसारखे आहेत. त्यांच्या हातात कसलीही सत्ता नाही. त्यांना केवळ वरिष्ठांनी सांगेल तसे वागावे लागते. ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. किंवा कायदा बनवण्यात भाग घेऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांवर केली.

त्यांच्या या टीकनेनंतर ते पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यापुर्वी ओबीसी प्रतिनिधित्वावरून त्यांच्यावर भाजपच्या खासदारांनी टीका केली होती.

तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही सरकार अधिकारी चालवत नसल्याचे सांगत लोकसभेत भाजपचे मोठ्या प्रमाणात ओबीसी खासदार असल्याचे सांगितले होते. राहुल गांधी यांनी देशात ओबीसी सचिवांची संख्या कमी असल्यावरून भाजपवर टीका केली होती.

Rahul Gandhi On Member Of Parlieaments
Udhayanidhi Stalin: सनातन धर्माबाबतचे वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन यांना भोवणार?; सुप्रीम कोर्टाने पाठवली नोटीस

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी, शुक्रवारी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष हटविण्यासाठी महिला आरक्षण विधेयकाची युक्ती केंद्र सरकारने केली आहे.

भाजपचा एकही खासदार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही किंवा कायदा बनवण्यात भाग घेऊ शकत नाही. यात काँग्रेसचे खासदार, भाजपचे खासदार किंवा इतर खासदारांचाही समावेश आहे. मोदी सरकारच्या काळात खासदार हे जणू मंदिरातील मूर्ती बनून गेले आहेत.

ओबीसी खासदार नव्हे तर जणू ओबीसी खासदारांच्या मूर्तीच संसदेत भरल्या गेल्या आहेत. पण त्यांच्याकडे काडीचीही सत्ता नाही. सत्ता चालवण्यात या खासदारांचे कोणतेही योगदान नाही. हाच प्रश्न मला उपस्थित करायचा आहे.

दरम्यान, खासदारांची मंदिरातील मूर्तीसोबत तुलना केल्यानंतर भाजपचे अनेक नेत्यांनी सोशल मीडियातून राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.

Rahul Gandhi On Member Of Parlieaments
CM Pramod Sawant: राजस्थान हे काँग्रेसचे एटीएम; तिथून येणाऱ्या पैशांवरच चालतो काँग्रेस पक्ष...

भाजप नेते पी. मुरलीधर राव यांनी, जर त्यांना मूर्ती शक्तीहीन वाटतात तर गांधींचे वंशज मंदिरांना भेटी का देतात? असा सवाल केला आहे. राहुल हे हिंदुविरोधी आहेत. ते पुन्हा उघडे पडले आहेत. अशी वक्तवे राहुल गांधींसाठी नवीन नाहीत.

तर काही नेटकऱ्यांनी राजकारणासाठी हिंदू मुर्तींचा अपमान करू नका, निवडणुकीवेळी मंदिरात जाऊन मुर्तीची पुजा करता तेव्हा हे वक्तव्य लक्षात ठेवा, असे म्हटले आहे.

आणखी एकाने म्हटले आहे की, आधी तमिळ पप्पू सनातन धर्म नष्ट करू इच्छित होते. आणि इटालियन पप्पूंनीही हिंदू विरोधी वक्तव्ये सुरू केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com