Qatar releases 8 Indian Navy personnel sentenced to death X, ANI
देश

Video: राजनैतिक विजय! फाशीची शिक्षा दिलेल्या 8 भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची कतारकडून सुटका

India Qatar: आश्चर्यकारक बाब म्हणजे कतारशी भारताचे संबंध चांगले मानले जातात. यानंतरही कतारने आठ भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Ashutosh Masgaunde

Qatar releases 8 Indian Navy personnel sentenced to death:

कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. यापूर्वी, भारताच्या विनंतीवरून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका आणि घरी परतण्यासाठी कतार राज्याच्या अमिराच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो.'

कतारच्या न्यायालयाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

या निर्णयामुळे भारताला प्रचंड धक्का बसला होता. त्यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले होते. मात्र, भारत सरकारने या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले होते.

आश्चर्यकारक बाब म्हणजे कतारशी भारताचे संबंध चांगले मानले जातात. यानंतरही कतारने आठ भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

हे आठही भारतीय खाजगी कंपनी Dahara Global Technologies and Consultancy Services मध्ये काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून भारतीय नागरिक कतारच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देत होते. ही कंपनी सागरी सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी कतारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करत होती.

रॉयल ओमान एअर फोर्सचे निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल-अजमी यांच्या मालकीची कंपनी आहे. गेल्या वर्षी भारतीयांसोबत अजमीलाही अटक करण्यात आली होती, परंतु नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली होती. मे मध्ये, दहराने दोहामधील आपले कामकाज बंद केले आणि तेथे काम करणारे सर्व लोक घरी परतले होते.

वास्तविक, ज्या आठ भारतीयांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली ते सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी होते. हे अधिकारी गेल्या वर्षी ऑगस्टपासून कतारच्या तुरुंगात होते. भारत किंवा कतारी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरील आरोप सार्वजनिक केले नाहीत.

25 मार्च रोजी आठ माजी भारतीय नौदलाच्या सैनिकांवर आरोप दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर कतारी कायद्यानुसार खटला चालवला जात होता. त्याचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला होता आणि कतारमधील फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध निर्णय दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT