Muslim Countries: ईदपूर्वी कतार-बहारीन पुन्हा एकत्र, तिसऱ्या इस्लामिक देशात सुरु झाला मैत्रीचा नवा अध्याय

Muslim Countries leaders: आखाती देश बहरीन आणि कतार यांनी बुधवारी उशिरा एकमेकांशी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यास सहमती दर्शवली.
Muslim Countries 
leaders
Muslim Countries leadersDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Muslim Countries leaders: आखाती देश बहरीन आणि कतार यांनी बुधवारी उशिरा एकमेकांशी राजनैतिक संबंध पूर्ववत करण्यास सहमती दर्शवली. बहरीन हा चार अरब देशांपैकी एक आहे, ज्यांनी 2017 मध्ये कतारशी सर्व संबंध तोडले होते.

2011 च्या अरब स्प्रिंगनंतर काही देशांमध्ये सत्तेवर आलेल्या इस्लामी संघटनांना कतारने पाठिंबा दिल्याने हे देश संतप्त झाले होते. अनेक देशांनी या संघटनांना दहशतवादी गट म्हणून पाहिले.

दरम्यान, सौदी अरेबिया (Saudi Arabia), इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2021 च्या सुरुवातीला कतारशी राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत तिन्ही देशांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी कतारला अधिकृत भेटी दिल्या आहेत.

Muslim Countries 
leaders
Islamic Countries: इस्लामिक जगतात मोठी घडामोड, सौदी अरेबिया 'या' कट्टर शत्रूशी करणार हातमिळवणी!

तसेच, बहरीन आणि कतार (Qatar) यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) मुख्यालयात त्यांच्या संबंधित शिष्टमंडळांची भेट घेतल्यानंतर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात राजनैतिक संबंध पुनर्संचयित करण्याचा निर्णय जाहीर केला. जीसीसी हा बहारीन आणि कतारसह सहा देशांचा समूह आहे.

Muslim Countries 
leaders
China: सौदी अरेबिया अन् इराण यांच्यातील कराराचा भारतावर होणार परिणाम?

दुसरीकडे, बहरीनचा कतारसोबतचा वाद मुख्यतः कतारचे इराणशी असलेले संबंध आणि त्यांच्या सागरी सीमा समस्यांवर केंद्रित आहे. इराण आणि सौदी अरेबियामधील प्रादेशिक विवाद सोडवण्याच्या इतर अनेक प्रयत्नांदरम्यान संबंधांची ही पुनरावृत्ती झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

UN General Assembly Viral Video Syria Leader Phone
Houthi Rebels Threat Pakistan Turkey Makkah Pact
Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait
Goa Bahrain Cricket Agreement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com