Pushkar Singh Dhami  Dainik Gomantak
देश

नव्या नवरी प्रमाणे सजले उत्तराखंड; पुष्कर धामी आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

पुष्कर सिंह धामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

दैनिक गोमन्तक

उत्तराखंडला (Uttarakhand) आज 12वे मुख्यमंत्री मिळतील. पुष्कर सिंह धामी () आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या खास सोहळ्यासाठी देहरादूनचा प्रत्येक भाग अगदी नव्या नवरी प्रमाणे सजवण्यात आला आहे. डेहराडून येथील परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पुष्कर धामी यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित लावणार आहेत. त्याचबरोबर पुष्कर सिंह धामी यांच्या नवीन मंत्रिमंडळात सामील होणार्‍या लोकांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत राजभवनातून माहिती दिली जाणार आहे. (Pushkar Singh Dhami will be sworn in as Chief Minister of Uttarakhand today)

पुष्कर सिंह धामींच्या मंत्रिमंडळात काही जुन्या चेहऱ्यांनाही स्थान

मंत्रिमंडळात गणेश जोशी, धनसिंग रावत, सतपाल महाराज, रेखा आर्य, अरविंद पांडे, प्रेमचंद्र अग्रवाल, मदन कौशिक, बिशन सिंग चुफळ आणि बन्सीधर भगत या जुन्या चेहऱ्यांच्या नावांचा देखील समावेश असणार आहे. यापैकी एका चेहऱ्याला विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारीही दिली जाऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात येत आहे. त्याचवेळी तराईतील आमदार मदन कौशिक आणि सौरभ बहुगुणा यांच्यापैकी एकाला मंत्रीपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. कुमाऊंमधून विशन चुफळ आणि बंशीधर भगत यांचाही दावेदारी आहे.

तरुणांनाही संधी

जुन्या चेहऱ्यांसोबतच अनेक तरुणांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. धामी यांच्या नवीन मंत्रिमंडळात रितू खंडुरी, सौरभ बहुगुणा, शिव अरोरा, विनोद चमोली आणि मोहन सिंग बिश्त यांचाही समावेश आहे. लाल कुआंमधून हरीश रावत यांचा पराभव करणाऱ्या मोहन सिंग बिश्त यांनी सांगितले आहे की, मला आशा आहे की या प्रकरणात त्यांना संधी मिळणार आहे.

तर राज्याभिषेकाचे हे मुख्य कारण

धामी खतिमामधून निवडणूक हरले, पण त्यांचेच मस्तक पगडीने सजले आहे. यामागचे एक कारण म्हणजे धामी यांची मुख्यमंत्रीपदी पुनर्नियुक्ती व्हावी यासाठी त्यांचा विधानसभा मतदारसंघ खतिमासह राज्यातील इतर भागांतून जबरदस्त प्रदर्शन झाले. भाजप कार्यकर्ते आणि धामी समर्थकांनी सांगितले आहे की, धामी यांच्याकडे राज्याची सत्ता दिली तेव्हा भाजपची स्थिती कमकुवत होती. सत्तेची चावी मिळाल्यानंतर धामी यांनी राज्यात असा बदल घडवला की राज्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते.

आणि मग भाजपला पूर्ण बहुमत मिळाले

उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly elections) भाजपने 70 पैकी 47 जागा आपल्या नावावरती केल्या. आणि आता पक्ष आता पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 19, बहुजन समाज पक्ष आणि अपक्षांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत.

प्रत्येक कोपऱ्यांवरती पोलिसांची नजर

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. शपथविधी सोहळ्याच्या परिसरात आणि आजूबाजूला जिल्हा प्रशासन, पोलीस आणि गुप्तचर विभाग तैनात करण्यात आले आहेत. रोज गल्ली-बोळांमध्ये तपासणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT