Pushkar Singh Dhami  Dainik Gomantak
देश

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी हे भाजपचे नवे मुख्यमंत्री असतील. सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर धामी (Chief Minister Uttarakhand Pushkar Singh Dhami) यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्याबाबतचा गोंधळ अखेर संपला. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय मीनाक्षी लेखी आणि राज्य निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी यांना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक सुरु झाली होती. तब्बल 11 दिवसांच्या मंथनानंतर मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टता आली. केंद्रीय पर्यवेक्षक आणि प्रभारी दुपारी डेहराडूनच्या (Dehradun) जॉली ग्रँट विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक नेते आले होते. तेथून ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले होते. (Pushkar Singh Dhami becomes the new Chief Minister of Uttarakhand)

दरम्यान, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand), भाजपने पुष्कर धामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी 47 जागा जिंकत सत्तेत पुनरागमन केले. परंतु धामी स्वतः खतिमा मतदारसंघातून निवडणूक हरले, तर 2021 पासून ते या जागेवरुन आमदार होते. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये धामी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांच्याशिवाय चौबताखलचे आमदार सतपाल महाराज, श्रीनगरचे आमदार धनसिंग रावत, राज्यसभा खासदार अनिल बलुनी, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि केंद्रीय मंत्री अजय भट्ट हे देखील दावेदारांमध्ये असल्याचे सांगण्यात येत होते.

शिवाय, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP) विजयामागे धामी यांच्या भूमिकेला जास्त श्रेय देण्यात आले. अशा स्थितीत पुन्हा पाच वर्षांसाठी सरकारची कमान धामी यांच्याकडे सोपवावी असं म्हणणारा एक मोठा वर्ग भाजपमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यूपी, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पुष्कर सिंह धामीसह अनेक बड्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

SCROLL FOR NEXT