Punjab Assembly Elections 2022 Dainik Gomantak
देश

गुरदासपुर निवडणूक प्रचारादरम्यान दोन अकाली दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या, काँग्रेसवर आरोप

फतेहगढ चुरियन मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिरोमणी अकाली दलाचे समर्थक करमजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेसच्या दोन सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील (Panjub) विधानसभा निवडणुकीचा (Assembly Elections 2022) प्रचार शुक्रवारी संपला असून आता उद्या येथे मतदान होणार आहे.मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात शिरोमणि अकाली दलाच्या (Shiromani Akali Dal) एका समर्थकाची हत्या केल्या प्रकरणी दलाने कॉंग्रेसच्या (Congress) दोन संरपंचाविरोधात केस फाइल केली आहे. पोलिसांचा दावा आहे की रोड शो दरम्यान अकाली दलाच्या नेत्याची काँग्रेस समर्थकांशी बाचाबाची झाली ज्यामध्ये एक समर्थक गंभीर जखमी झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

फतेहगढ चुरियन मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिरोमणी अकाली दल (SAD) समर्थक करमजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या दोन सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाटला पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, अकाली दलाचे उमेदवार लखबीर सिंग लोधियांगल यांच्या रोड शोबाबत शुक्रवारी संध्याकाळी अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेसबॉलने वार करून गंभीर जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "भांडणाच्या वेळी शियारा आणि पट्टी शिरा गावांचे सरपंच तजिंदरपाल सिंग आणि जसवंत सिंग यांनी करमजीतवर हल्ला केला.हे दोन्ही सरपंच काँग्रेसचे आहेत. त्यांनी करमजीतवर बेसबॉलने वार केले. पीडित गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीने जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले."

मृत करमजीत सिंग यांचे वडील गुरवंत सिंग म्हणाले, "आम्ही आमच्या पक्षासाठी (अकाली दल) मते मागत होतो. जतिंदर पाल सिंग, बलविंदर सिंग, तजिंदरपाल सिंग, मुखतियार सिंग, गुरविंदर सिंग, जसवंत सिंग आणि इतर लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्या मुलावर अचानक हल्ला केला. जमिनीवर पडून बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी त्याला मारहाण केली. आरोपींशी आमचे कोणतेही वैर नव्हते. ते गावातील आमच्या कुळातील आहेत. मात्र मतांसाठी त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली."

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला

117 सदस्यीय पंजाब विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसशिवाय शिरोमणी अकाली दल-बहुजन समाज पक्ष युती, भारतीय जनता पक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) एकत्र निवडणूक लढवत आहे.

दरम्यान, पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने 13 आश्वासनांसह आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पंजाब काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. सरकार स्थापन होताच एक लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन काँग्रेसने जारी केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. यासोबतच मोफत सिलिंडर, मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य सेवा देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना मंचावर मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी, पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रभारी हरीश चौधरी आणि पवन खेडा उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT