"भारत का जन्म थोड़े ही 1947 में हुआ है": पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंजाब निवडणुकीपूर्वी (Punjab Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ शीख नेत्यांची भेट घेतली.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाब निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ शीख नेत्यांची भेट घेतली. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा जन्म 1947 मध्ये झाला नव्हता. पंजाबमध्ये रविवारी निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ते असे म्हणताना दिसत आहेत की, "हा देश 1947 मध्ये जन्माला आलेला नाही. त्या काळात पंजाबमध्ये (Punjab) आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह झाला होता. त्यावेळी मी भूमिगत होतो. मी वेगवेगळे वेश धारण करायचो. लपायला मी पगडी घालायचो." (Prime Minister Modi Said That India Was Not Born In 1947)

दरम्यान, शीख समुदायाला उद्देशून पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) पुन्हा म्हटले, 1947 च्या फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब गुरुद्वारा भारतात ठेवण्यात काँग्रेस अपयशी ठरली. आणि आता करतारपूर साहिब गुरुद्वारा पाकिस्तानातील पंजाबपासून 6 किमी दूर आहे.

Prime Minister Narendra Modi
Punjab Election 2022: 'जनतेच्या समस्यांसाठी भाजप अजूनही नेहरुंनाच दोष देतोय'

पंतप्रधान पुढे म्हणाले, "काँग्रेस (Congress) केवळ 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्तारपूरला भारतासोबत जोडण्यासाठी प्रयत्न करु शकले नाही. मी राजनैतिक मार्गाने बोलणे सुरु केले. जेव्हा मी पंजाबमध्ये राहत होतो, तेव्हा मी कर्तारपूर साहिबला पाहायचो. त्यावेळी मला वाटायचे की आपण काहीतरी केले पाहिजे."

"गुरुंच्या कृपेने आम्ही हे पवित्र कार्य करु शकलो. एवढ्या कमी वेळात आम्ही केलेले कार्य श्रद्धेशिवाय शक्य झाले नसते."

Prime Minister Narendra Modi
Punjab Election 2022: काँग्रेसला मोठा धक्का, तीन कॉंग्रेसी झाले 'आप' वासी

"गुरुंच्या कृपेने आम्ही हे पवित्र कार्य करु शकलो. इतक्या कमी वेळात आम्ही केलेले काम विश्वासाशिवाय शक्य नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथ साहिब परत आणल्याचाही उल्लेख केला."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com